घरदेश-विदेशStock Market : निवडणूक निकालानंतर सेन्सेक्स-निफ्टी नवा विक्रम, सेन्सेक्स 1014 अंकांनी वाढला,...

Stock Market : निवडणूक निकालानंतर सेन्सेक्स-निफ्टी नवा विक्रम, सेन्सेक्स 1014 अंकांनी वाढला, निफ्टी 20500 च्या पुढे

Subscribe

Stock Market : रविवारी (ता.03 डिसेंबर) चार राज्यांच्या निवडणूक निकालांचा परिणाम शेअरमार्केटवर झाल्याचं दिसून येत येत आलं. खुल्या सत्रापूर्वीच शेअर बाजारात जोरदार वाढ दिसून आली. एकीकडे, बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचा 30 शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स (BSE Sensex) 954 अंकांनी झेपावला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी (NSE Nifty) देखील 334 अंकांच्या वाढीसह व्यवहार करत आहे. बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टीने नवीन विक्रमी पातळी गाठली. तीन राज्यांतील भाजपच्या दणदणीत विजयाचा परिणाम शेअर बाजारातील तेजीच्या रूपात दिसून येईल, अशी आशा आधीच तज्ज्ञ व्यक्त करत होते.

भारतीय शेअर बाजाराचा मुख्य निर्देशांक निफ्टी सकाळी 9.15 वाजता नवीन विक्रमी उच्चांकावर उघडला. निफ्टी 276.40 अंकांच्या किंवा 1.36 टक्क्यांच्या वाढीसह 20,600 च्या पातळीवर उघडला. निफ्टीवरील अदानी एंटरप्रायझेस (Adani Enterprises), अदानी पोर्ट्स (Adani Ports), एनटीपीसी(NTPC), एसबीआय (SBI) आणि एल अँड टी कंपन्यांच्या समभागांमध्ये जोरदार वाढ दिसून आली. सुरुवातीच्या व्यापारात सर्वात मोठी वाढ अदानी समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसच्या समभागांमध्ये दिसून आली, जी 7.04 टक्के किंवा 166.30 रुपयांच्या तुफानी वाढीसह 2,529.00 रुपयांवर पोहोचली.

- Advertisement -

दुसरीकडे, जर आपण बीएसई सेन्सेक्सबद्दल बोललो तर, हा निर्देशांक 882.38 अंक किंवा 1.31 टक्क्यांच्या उसळीसह 68,363.57 च्या पातळीवर उघडला. बाजार उघडताच जवळपास 2194 शेअर्समध्ये वाढ झाली, तर 259 शेअर्स लाल रंगात उघडले, तर 119 शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही.

शेअर बाजारातील व्यवहाराच्या अवघ्या 10 मिनिटांत सेन्सेक्सने 1000 हून अधिक अंकांची उसळी घेतली. वृत्त लिहेपर्यंत सेन्सेक्स निर्देशांक 1,032.75 अंकांच्या किंवा 1.53 टक्क्यांच्या वाढीसह 68,513.94 च्या पातळीवर व्यवहार करत होता. या काळात निफ्टी बँकेचा उत्साहही उच्च पातळीवर दिसून आला आणि तो 970.60 अंकांनी किंवा 2.17 टक्क्यांनी वाढून 45,784.80 च्या पातळीवर व्यवहार करत होता.

- Advertisement -

शेअर बाजारात निवडणुकीचा प्रभाव पडण्याचे संकेत आधीच दिसत होते. गेल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी सेन्सेक्स-निफ्टी जोरदार वाढीसह बंद झाले. सेन्सेक्स 492.75 अंक किंवा 0.74% च्या वाढीसह 67,481.19 च्या पातळीवर बंद झाला. दुसरीकडे, NIFTY-50 134.75 अंकांच्या किंवा 0.67% च्या वाढीसह 20,267.90 च्या पातळीवर बंद झाला.

इतकंच नाही तर पाच राज्यांमध्ये झालेल्या निवडणुका आणि निवडणुकीचे निकाल येत असताना गेल्या काही दिवसांत शेअर बाजाराचा सेन्सेक्स आणि निफ्टीनेही नवी उंची गाठली आहे. 1 डिसेंबर 2023 रोजी निफ्टीने पुन्हा एकदा त्याच्या सर्वकालीन उच्च पातळीवर झेप घेतली. यापूर्वी २९ नोव्हेंबरला सेन्सेक्सने नवा इतिहास रचला होता. वास्तविक, BSE चे मार्केट कॅप 4.1 ट्रिलियन डॉलर्स किंवा 3,33,26,881.49 कोटी रुपयांवर पोहोचले होते आणि यासह भारतीय शेअर बाजार टॉप-5 बाजारांच्या यादीत सामील झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -