घरदेश-विदेशमिझोराममध्ये कोसळली दगड खाण; 15 जण अडकल्याची भीती

मिझोराममध्ये कोसळली दगड खाण; 15 जण अडकल्याची भीती

Subscribe

या दुर्घटनेची माहिती मिळताच जवळच्या शहरातील बचाव पथकाच्या स्वयंसेवकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य मोहिम सुरु केली.

ईशान्य भारतातील मोझोराम (mizoram) राज्यात एक दगड खाण कोसळल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघात 15 कामगार अडकले असल्याची भित्ती व्यक्त केली जात आहे. ही घटना सोमवारी 14 नोव्हेंबर रोजी घडली. खाणीतली कामगार दुपारच्या जेवणाच्या सुट्टीनंतर पुन्हा कामावर परतत असताना ही दुर्घटना घडली आहे.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, दुर्घटना घडली तेव्हा नथिलाल जिल्ह्यातील मौदार इथे एबीसीएल इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. या दगड खाणीत काम करणारे कामगार नुकतेच जेवणाच्या सुटीवरुन खाणीत काम करण्यासाठी परतत होते. दरम्यान कोसळलेल्या या खाणीत 15 कामगार अडकले आहेत. यामध्ये पाच पोकलेनचे चालक आणि इतर ड्रिलिंग मशीनचे ऑपरेटर्स या दगडांच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले.

- Advertisement -

या दुर्घटनेची माहिती मिळताच जवळच्या शहरातील बचाव पथकाच्या स्वयंसेवकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य मोहिम सुरु केली. मदतीसाठी राज्य सरकारने अधिक बचाव पथकांना घटनास्थळी पाचारण केले आहे. ही घटना खूप भीषण आहे. त्यामुळे परिसरातही भीतीचे वातावरण आहे.

मिझोराममध्ये जशी ही दुर्घटना घडली त्याप्रमाणे काहीच दिवसांपूर्वी गुजरात राज्यातील मोरबीमध्येही दुर्घटना घडली होती. गुजरातच्या मोरबीमध्ये मच्छू नदीवरील पूल कोसळल्याची धक्कादायक घटना घडली होती. पूल कोसळल्याने १४३ हून अधिक जण पाण्यात बुडाल्याची भिती वर्तवली जात होती. घटनास्थळी सुरक्षारक्षक दाखल झाले आणि त्यांनी शर्तीच्या प्रयत्नांनी बचाव कार्याला सुरूवात केली देखील केली होती.यात धक्कादायक बाब म्हणजे या मृतांमध्ये भाजपा खासदार मोहन कंदारिया यांच्या कुटुंबातील 12 जणांचा समावेश आहे. याबाबत स्वत: मोहन कुंदारिया यांनी माहिती दिली. (12 members of Rajkot BJP MP Mohan Kalyanji Kundariya family killed in Morbi bridge collapse)

- Advertisement -

मोहन कुंदारिया हे भाजपाचे राजकोटमधील खासदार आहेत. या मोरबी पूल कोसळल्याच्या दुर्घटनेनंतर भाजपा खासदार मोहन कुंदारिया यांनी ‘इंडिया टुडे’ या वृत्तवाहिनीशी बातचित करताना याबाबत माहिती दिली. “या दुर्घटनेत मी 5 मुलांसह माझ्या कुटुंबातील 12 सदस्यांचा मृत्यू झाला. बोरबी दुर्घटना सुद्धा भीषण संपवरूपाची होती.


हे ही वाचा – राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत महाराष्ट्रातील मोठ्या नेत्याला गंभीर दुखापत; धक्काबुक्कीमुळे घडला प्रकार

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -