घरताज्या घडामोडीकानपूरमध्ये मोदींच्या दौऱ्याआधी तुफान राडा, दगडफेकीत दहापेक्षा जास्त जखमी

कानपूरमध्ये मोदींच्या दौऱ्याआधी तुफान राडा, दगडफेकीत दहापेक्षा जास्त जखमी

Subscribe

मोदींच्या दौऱ्याआधीच दोन समाजात वादाची ठिणगी (Violence) पडल्याने दोन गटात दगडफेक (stone pelting) झाली. या दगडफेकीत दहापेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज कानपूर (Kanpur) दौऱ्यावर आहेत. मात्र, याच काळात कानपूरमध्ये मोठा हिंसाचार घडून आला. मोदींच्या दौऱ्याआधीच दोन समाजात वादाची ठिणगी (Violence) पडल्याने दोन गटात दगडफेक (stone pelting) झाली. या दगडफेकीत दहापेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. या घटनेचे काही व्हिडिओ समोर आले असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) येथील कानपूर (Kanpur) येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कानपूरमध्ये आले. यावेळी नरेंद्र मोदी विविध कार्यक्रमांचं उद्घाटन करणार आहेत. दुपारी तीन ते साडेतीनच्या दरम्यान मोदी कानपूरमध्ये आल्यानंतर ते कार्यक्रमस्थळी जाण्याआधीच मोठा वादंग झाला. यावेळी दोन गटात राडा झाला. या राड्यादरम्यान तुफान दगडफेक झाली. जमावाला पांगवण्यासाठी संबंधित परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. अश्रू धुरांच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. सध्या या परिसरात तणावपूर्ण शांतात असून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

- Advertisement -

दगडफेक का झाली?

- Advertisement -

भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांनी प्रेषित महंमद पैगंबर (Preshit Mahanmad Sharma) आणि इस्लाम धर्म (Ismal) यांच्याबाबत अपशब्द वापरल्याचे सांगण्यात येत आहे. एका खासगी वृत्तवाहिनीच्या चर्चासत्रात त्यांनी वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याचा निषेध म्हणून कानपूरमध्ये काही नागरिकांनी आज बाजार बंदची हाक दिली होती. मात्र, या बंदला नागरिकांनी विरोध केला. या विरोधातूनच दोन गटात राडा झाला. यातूनच दगडफेक झाली.

जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्या. यामुळे येथे सध्या तणावपूर्ण शांतता असल्याचे सांगण्यात येत आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -