घरदेश-विदेशवडोदऱ्यात रामनवमीच्या शोभायात्रेवर समाजकंटकांची दगडफेक, पोलिसांचा वेळीच हस्तक्षेप

वडोदऱ्यात रामनवमीच्या शोभायात्रेवर समाजकंटकांची दगडफेक, पोलिसांचा वेळीच हस्तक्षेप

Subscribe

देशभरात रामनवमीचा सण उत्साहात साजरा करण्यात येत आहेत. पण या सणाला गुजरातमधील वडोदरा शहरात गालबोट लागल्याची माहिती समोर आली आहे.

देशभरात आज (ता. ३० मार्च) रामनवमीचा सण उत्साहात साजरा करण्यात येत आहे. देशभरात अनेक ठिकाणी शोभायात्रा देखील काढण्यात आलेल्या आहेत. पण गुजरात राज्यातील वडोदरा शहरात रामनवमीच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या शोभायात्रेवर दगडफेक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. काही समाजकंटकांनी या शोभायात्रेवर दगडफेक केल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेमुळे वडोदरा शहरासह राज्यामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. परंतु, पोलिसांनी तात्काळ घटनेचे गांभीर्य ओळखून कारवाई करत येथील परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. तर सध्या वडोदरा शहरात पोलिसांचा मोठा फौजफाटा देखील तैनात करण्यात आला आहे. परंतु, पुन्हा एकदा सायंकाळच्या सुमारास या शोभायात्रेवर दगडफेक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरात राज्यातील वडोदरा शहरात रामनवमीनिमित्त शोभायात्रा काढण्यात आली होती. ही मिरवणूक शहरातील फतेपुरा गराना पोलीस ठाण्याजवळ आल्यानंतर अचानक काही समाजकंटकांनी दगडफेक करण्यास सुरूवात केली. त्यानंतर काही कळण्याच्या आत दोन गटात जोरदार दगडफेक सुरु झाली. तर मशिदीजवळ हा राडा झाल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

दरम्यान, या घटनेनंतर तात्काळ पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात कारवाई करण्यास सुरूवात केली. सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्याने पोलिसांकडून आरोपींना पकडण्यात येत असल्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. तर इतर कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांची पथके तैनात करण्यात आल्याने या भागाला छावणीचे स्वरुप आले आहे.

तर रामनवमीनिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेवर एका मशिदीजवळ दगडफेक झाल्याने परिस्थिती तणावपूर्ण झाली होती. परंतु, पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन्ही गटाला शांत केले असून या मिरवणुकीत सहभागी झालेल्या लोकांना घरी पाठवण्यात आले आहे. या दगडफेकीत कोणीही जखमी झालेले नाही. तसेच ही मिरवणूक पुढे सोडण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची तोडफोड झालेली नाही, अशी माहिती वडोदरा शहराचे डीसीपी यशपाल जागानिया यांच्याकडून देण्यात आलेली आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रात देखील रामनवमीच्या आदल्या दिवशी (ता. २९ मार्च) रात्री छत्रपती संभाजीनगर येथे दोन गटांमध्ये हाणामारी झाली. दोन गट आमने-सामने आल्याने झालेल्या राड्यामुळे सध्या संभाजीनगरमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.


हेही वाचा – रामनवमीच्या दिवशी मोठी दुर्घटना, इंदूरमध्ये मंदिराच्या विहिरीत २५ जण कोसळले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -