Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेकीचे सत्र सुरूच; पोलिसांकडून चौकशी

वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेकीचे सत्र सुरूच; पोलिसांकडून चौकशी

Subscribe

नवी दिल्ली : केरळमध्ये (Kerala) 24 एप्रिलला सुरू झालेल्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनवर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली आहे. वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन (Vande Bharat Express Train) भारतात सुरू झाल्यापासून दगडफेकीच्या घटना वारंवार घडत आहेत.

केरळमधील घटनेबद्दल रेल्वे अधिकाऱ्यांनी माहिती देताना सांगितले की, उत्तर केरळ जिल्ह्यातील थिरुनावया आणि तिरूर दरम्यान ट्रेन जात असताना संध्याकाळी 5 च्या सुमारास अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली आहे. या हल्ल्यानंतर ट्रेनने तिरुअनंतपुरमकडे प्रवास सुरू ठेवला होता आणि या हल्ल्यात प्रवाशांना दुखापत झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार अज्ञातांकडून करण्यात आलेल्या दगडफेकीमुळे ट्रेनच्या काही खिडक्यांवर किरकोळ ओरखडे पडले आहेत.

- Advertisement -

आठवड्यापूर्वीच वंदे भारत एक्सप्रेस सुरू
केरळमध्ये सुरू झालेली नवीन वंदे भारत एक्सप्रेस कासारगोड ते तिरुवनंतपुरम सेंट्रल मार्गावर धावणार आहे. नव्या वंदे भारत एक्सप्रेसला कासारगोड ते तिरुवनंतपुरम सेंट्रल हे अंतर 8 तास 5 मिनिटांत पूर्ण करणार आहे. वंदे भारत एक्सप्रेसचा वेग राजधानी एक्सप्रेसच्या तुलनेत खूप जास्त आहे. कासारगोड ते तिरुअनंतपुरम सेंट्रल या राजधानी एक्स्प्रेसने प्रवास करण्यासाठी अंदाजे 10 तास आणि 45 मिनिटे लागतात. वंदे भारत एक्सप्रेससाठी केरळमधील 11 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. ही देशातील 16वी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन आहे. तिरुवनंतपुरम सेंट्रल – कासारगोड वंदे भारत एक्सप्रेस कोल्लम, कोट्टायम, एर्नाकुलम टाउन, त्रिशूर, शोरानूर जंक्शन, कोझिकोड, कन्नूर आणि कासारगोड या मार्गावर थांबेल.

याआधीही दगडफेकीच्या घटना
देशात वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेकीच्या या आधीही अनेक घटना समोर आल्या आहेत. या घटनांना आळा घालण्यासाठी रेल्वेने या गाड्यांच्या मार्गावर येणाऱ्या गावांची लोकांना जाणीव करून देण्याची योजना आखली आहे. विभागीय स्तरावर यासाठी जनजागृती करण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांची टीम तयार करणार आहे. या वर्षी फेब्रुवारीमध्ये तेलंगणातील महबूबाबाद जिल्ह्यातून जाणाऱ्या सिकंदराबाद-विशाखापट्टणम वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनच्या डब्यावर अज्ञातांनी दगडफेक केली होती. यानंतर रेल्वे संरक्षण दलाने (आरपीएफ) त्याची दखल घेतली. प्राथमिक तपासाच्या आधारे अधिकाऱ्यांनी सांगितले होते की, काही मुलांनी ट्रेनवर दगडफेक केली असावी.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -