घर देश-विदेश Stop Raging : आधी काढली होती त्याची नग्न धिंड म्हणूनच घेतली इमारतीवरून...

Stop Raging : आधी काढली होती त्याची नग्न धिंड म्हणूनच घेतली इमारतीवरून उडी; जाधवपूर विद्यापीठातील प्रकार

Subscribe

आपल्या देशात विद्यार्थ्यांचा छळ म्हणजे रॅगिंगविरुद्ध कायदा असतानाही आजही अनेक विद्यापीठात विद्यार्थी रॅंगिंगचे बळी ठरत आहेत.

कोलकता : आपल्या देशात विद्यार्थ्यांचा छळ म्हणजे रॅगिंगविरुद्ध कायदा असतानाही आजही अनेक विद्यापीठात विद्यार्थी रॅंगिंगचे बळी ठरत आहेत. दरम्यान कोलकत्याच्या जाधवपूर विद्यापीठात असाच एक प्रकार समोर आला असून, प्रथम वर्षात असलेल्या एका विद्यार्थ्याची त्याच्या सिनिअरनी छळ काढल्याने त्याने इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.(Stop Raging Jump from the building taken as his naked body which was removed earlier Type in Jadhavpur University)

पीटीआयच्या वृत्तानुसार, पश्चिम बंगालमधील जाधवपूर विद्यापीठात 9 ऑगस्टच्या रात्री स्वप्नदीप कुंडू (18) या विद्यार्थ्याचा लैंगिक छळ करण्यात आला होता. त्याच्या मृत्यूच्या काही वेळाआधी त्याला वसतिगृहाच्या एका खोलीत कपडे उतरवण्यास भाग पाडून त्याच्या सिनीअर्सनी त्याला पुरूषत्व सिद्ध करण्यास भाग पाडले होते. एवढेच नव्हे तर पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीच्या आधारे त्याला नग्न करून त्याला दुसऱ्या मजल्यावरच्या कॉरिडॉरमध्ये नग्न फिरायला लावण्यात आले होते.

12 जणांना अटक

- Advertisement -

कोलकाता पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, अटक करण्यात आलेल्या 12 तरुणांविरुद्ध आम्हाला पुरावे मिळाले आहेत. रॅगिंगमध्ये प्रत्येकाची भूमिका आहे. रॅगिंगची घटना लपवण्यासाठी एका आरोपीने व्हॉट्सअप ग्रुप तयार केला होता. प्रत्येकाने पोलिसांची दिशाभूल करण्याचा डाव आखला होता. तर आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या प्रकरणाचा तपास CID सीआयडीकडे सोपवण्यात आल्याची माहिती दिली आहे.

हेही वाचा : हृषिकेशपासून सिंगापूरपर्यंत चांद्रयान-3 च्या यशस्वीतेसाठी केली जातेय प्रार्थना, पूजा-अर्चा, होमहवन अन् बरंच काही

प्रकरण मुख्यमंत्री बॅनर्जीकडे

- Advertisement -

विद्यार्थ्याचा छळ आणि त्यांनतर झालेली आत्महत्या हे प्रकरण सध्या पश्चिम बंगालमध्ये चांगलेच गाजत आहे. याप्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममत बॅनर्जी यांनी या प्रकरणाची दखल घेतली असून, त्या म्हणाल्या की, या घटनेमुळे आमचे डोळे उघडले. तर पुढे अशा घटना घडू नये म्हणून त्यांनी एक हेल्पलाईन नंबरही जारी केला आहे.

हेही वाचा : Chandrayaan – 3 : इस्रोसह नासाचेही ‘चांद्रयान-3’च्या मोहिमेकडे लक्ष; कव्हरेजबाहेर गेल्यास ‘हा’ देशही करणार मदत

टीएमसी-भाजप आमने-सामने

सध्या पश्चिम बंगालचे पावसाळी अधिवेशन सुरू असून, दरम्यान विद्यार्थ्याच्या आत्महत्येचे प्रकरण याच पावसाळी अधिवेशनापर्यंत जाऊन पोहचले आहे. तेव्हा या पावसाळी अधिवेशनात विरोधक भाजप सत्ताधारी टीएमसीला चांगलेच धारेवर धरत असल्याचे दिसून येत आहे.

- Advertisment -