घरताज्या घडामोडीमजुरांचे स्थलांतर, कोरोना गावापर्यंत पोहोचला; ३१७ जण कोरोनाबाधित

मजुरांचे स्थलांतर, कोरोना गावापर्यंत पोहोचला; ३१७ जण कोरोनाबाधित

Subscribe

विविध राज्यांमधून घरी परतणाऱ्या मजुरांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

देशात लॉकडाऊन आहे पण, तरीही कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे राज्या राज्यात कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि लॉकडाऊन यामुळे मजुरांचे प्रचंड हाल झाले आहेत. त्यामुळे मजुरांनी आपल्या घरी जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्यासाठी विशेष ट्रेन देखील सोडण्यात आली आहे. मात्र, मजुरांचे होत असलेले स्थलांतर राज्यांसमोर एक मोठे संकट उभे राहू लागले आहे.

३१७ जणांना कोरोनाची लागण

विविध राज्यांमधून घरी परतणाऱ्या मजुरांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. सोमवारपर्यंत उत्तरप्रदेश, उत्तराखंड, बिहार आणि झारखंड या राज्यांमधून ११ लाख मजूर दाखल झाले होते. यातील ३१७ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

गुजरातमधून येणाऱ्या ५९ मजुरांना कोरोनाची लागण

सर्वात जास्त म्हणजे गुजरातमधून येणाऱ्या ५९ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तर दिल्ली एनसीआरमधून परतणाऱ्या ५३ आणि महाराष्ट्रातून परतणाऱ्या ४५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, राज्यातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चारही राज्यात मजुरांची स्क्रिनिंग करण्यात आली होती.

मुंबईतून केला ट्रकने प्रवास

तर, मुंबईत एकाच ठिकाणी काम करणाऱ्या ५४ मजुरांनी ट्रकने प्रवास केल्याचे समोर आले आहे. या मजुरांनी २ लाख ५४ हजार खर्च करुन हे मजूर वेगवेगळ्या गावी दाखल झाले आहेत. मात्र, या मजुरांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

झारखंडमध्ये सर्वात अधिक मजूर परतले

झारखंडमध्ये सर्वात अधिक मजूर परतले असून त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. सोमवारी सकाळपर्यंत ४० हजार मजूर राज्यात दाखल झाले होते. यापैकी सुमारे २३ हजार मजूर ट्रेनने दाखल झाले होते. तर ९ हजार मजूर बसने आले होते. मिळालेल्या माहितीनुसार; ४७ जणांना कोरोनाची लागण झाली असून यामधील २३ जण हे सूरतमधील आले आहेत. दरम्यान, या मजुरांच्या संपर्कात आलेल्या ८ हजार ९९३ जणांना क्वॉरंटाइन करण्यात आले आहे.

बिहारमध्ये १४२ जण दाखल

बिहारमध्ये सोमवारपर्यंत १ लाख २५ हजार मजूर बिहारमध्ये दाखल झाले आहेत. यातील १४२ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये ४१ एनसीआर, ३६ महाराष्ट्र, ३३ गुजरात, १० तेलंगणा आणि ३ हरियाणा येथून आले आहेत. तर १ लाख १० हजार जणांना क्वॉरंटाइन करण्यात आले आहे.

उत्तरप्रदेशमध्ये १०२ जणांना कोरोनाचीबाधा

उत्तरप्रदेशमध्ये आतापर्यंत ३३ जणांना कोरोनाची बाधा झाली होती. मात्र, आता दाखल झालेल्यांपैकी १०२ मजुरांना कोरोनाचीबाधा झाल्याचे समोर आले आहे.


हेही वाचा – कोरोना विषाणूची लस कधीच बनणार नाही; ब्रिटनच्या पंतप्रधानांचा इशारा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -