Corona : वाढत्या रुग्णसंख्येच्या संकटात ऑक्सिजनची कमतरता; केंद्राने जारी केले हे आदेश

Single-day spike of 95,735 new COVID19 cases & 1,172 deaths reported in India
Corona Update: देशातील कोरोनाबाधितांची संख्या ४४ लाख पार!

देशात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असतानाच हॉस्पिटलमध्ये रुग्णांना मुबलक प्रमाणात ऑक्सिजनदेखील मिळत नसल्याची स्थिती पाहायला मिळत आहे. दरम्यान, केंद्र सरकारने आज, शुक्रवारी एक निर्देश जारी करत महाराष्ट्राच्या वतीने मध्य प्रदेशाला ऑक्सिजन पुरवठा थांबवल्यानंतर केंद्राने सर्व राज्य तसेच केंद्र शासित प्रदेशांना एक पत्र पाठवले आहे. या पत्रात ऑक्सिजन पुरवठ्यावर निर्बंध न आणण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. कोरोनाच्या गंभीर रुग्णांना श्वसनाचा त्रास होत असताना त्यांच्यासाठी ऑक्सिजन आवश्यक असते.

केंद्रीय आरोग्य सचिव यांनी सर्व राज्य तसेच केंद्र शासित प्रदेशांना एकमेकांना ऑक्सिजन पुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत. त्याशिवाय हॉस्पिटलमधील सर्व कोविड रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा करणे आवश्यक असून ही जबाबदारी राज्यांची असल्याचे त्यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण असून आतापर्यंत ७,००,७१५ रुग्ण बरे झाले आहेत. तर अजूनही राज्यात २,६१,४३२ इतके Active रूग्ण असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. तर मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ६३ हजार ११५ वर पोहोचली असून यापैकी आतापर्यंत ८ हजार २० जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण १ लाख २८ हजार ११२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.

हेही वाचा – 

मी घरची धुनी रस्त्यावर धूत नाही; खडसेंच्या टीकेला फडणवीसांचं उत्तर