आज दिसणार स्ट्रॉबेरी मून, जाणून घ्या म्हणजे काय

Strawberry Moon to appear today

चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा करतो. मात्र, चंद्र त्यांच्या कक्षेत सर्वात जवळ किंवा दूर असणे याला अप्सिस असे म्हणातात. चंद्र पृथ्वीभोवती त्याच्या कक्षेत जवळ आला तर तो आकाराने मोठा दिसतो. याउलट चंद्र पृथ्वीभोवती त्याच्या कक्षेत दूर गेला तर तो आकाराने लहान दिसतो. आज चंद्र पृथ्वीला प्रदक्षिणा करताना कक्षेत सर्वात जवळ येईल. त्यामुळे तो आकाराने मोठा दिसेल. याला सूपरमून किंवा स्ट्रबेरी मून असे म्हणतात.

आज लोकांना चंद्र तेजस्वी आणि मोठा दिसेल. आकाश स्वच्छ असेल तर आकाशातील चंद्राचे रुप पाहता येणार आहे. सूर्यास्तानंतर आग्नेय दिशेकडून स्ट्रॉबेरी मून येईल. तो संध्याकाळी 5.22 वाजता पाहता येईल.

स्ट्रॉबेरी मून या नावावरून चंद्र गुलाबी रंगाचा दिसेल असा अंदाज असेल तर तो चुकीचा आहे. या दिवशी चंद्र स्ट्रॉबेरीसारखा दिसत नाही किंवा त्याचा रंग गुलाबीही नाही. हे नाव मूळ अमेरिकन लोकांनी पौर्णिमेला दिले होते. द ओल्ड फार्मर्स अल्मॅनॅकच्या मते, स्ट्रॉबेरी मून हे नावअल्गोनक्विन, ओजिब्वे, डकोटा आणि लकोटा लोकांद्वारे पहिल्यांदा वापरण्यात आले होते. कारण जूनमध्ये स्ट्रॉबेरीची कापणी केली जाते तेव्हा पौर्णिमेला दिसणाऱ्या चंद्राला स्ट्रॉबेरी मून असे संबोधले गेल्याचा अंदाज आहे.