घरताज्या घडामोडीUP Elections : उत्तर प्रदेश निवडणूकांमध्ये मोकाट जनावरांच्या हैदोसाचा मुद्दा कळीचा, नागरिक...

UP Elections : उत्तर प्रदेश निवडणूकांमध्ये मोकाट जनावरांच्या हैदोसाचा मुद्दा कळीचा, नागरिक हैराण

Subscribe

उत्तर प्रदेश निवडणूकांमध्ये मोकाट जनावरांच्या हैदोसाचा मुद्दा कळीचा ठरू शकतो. कारण गाय आणि बैल यांसारख्या मोकाट फिरणाऱ्या जनावरांमुळे नागरिक भयंकर हैराण झाले आहेत. उत्तर प्रदेशातील जवळपास प्रत्येक जिल्ह्यात भटक्या जनावरांनी शेतकऱ्यांचा श्वास कोंडला आहे. कारण मोकाट फिरणाऱ्या जनावरांमुळे शेतकऱ्यांच्या मालमत्तेचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

भूपेंद्र दुबे यांची कहाणी

चिरोंधापूरचे रहिवासी असलेले ३७ वर्षीय भूपेंद्र दुबे हे दिल्लीत काम करायचे आणि कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे तसेच पहिल्या लाटेच्या लॉकडाऊनमध्ये ते घरी परतले होते. परंतु २३ जून २०२० रोजी दीड वर्षाच्या मुलाला चॉकलेट आणण्यासाठी जात असताना गावातील बाजारात एका बैलाने त्यांच्यावर हल्ला केला. परंतु यावर त्यांची पत्नी पूनम देवी यांनी सांगितलं की, घरातील सामान संपल्यामुळे मुलाला चॉकलेट आणि काही सामान आणण्यासाठी बाजारात जातो, असं भूपेंद्र दुबेंनी आपल्या पत्नीला सांगितलं. परंतु नऊ वाजता पतीला फोन केल्यानंतर ते पाच मिनिटांत घरी येतो असे म्हणाले. मात्र, त्यानंतर माझा त्यांच्याशी संवाद झालाचं नाही, असं भूपेंद्र यांच्या पत्नी म्हणाल्या.

- Advertisement -

मोकाट फिरणाऱ्या जनावरांवरही राजकारण तापले

भारतात सुमारे २० कोटी गुरे आहेत. त्यापैकी उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक गुरं आहेत. सरकारी आकडेवारीच्या माहितीनुसार,
देशातील भटक्या गुरांची लोकसंख्या सरासरी ५० लाखांवर आली आहे. तसेच उत्तर प्रदेशातील काही राज्यांमध्ये ती १५% पेक्षा जास्त वाढली आहे. यूपी निवडणुका जवळ आल्या असून प्रत्येक राजकीय पक्षांतून दावे आणि प्रतिदावे केले जात आहेत. निवडणुकीच्या काळात मोकाट फिरणाऱ्या जनावरांवरही राजकारणही तापले आहे.

निवडणूक प्रचारादरम्यान पीएम मोदी काय म्हणाले?

राज्यातील निवडणूक प्रचारादरम्यान पीएम नरेंद्र मोदी म्हणाले होते की, गाय काही लोकांसाठी गुन्हा ठरू शकते. कारण गाय आमच्यासाठी मात आहे. ती पूजनीय आहे. गाय-म्हशीची थट्टा करणारे लोकं विसरतात की, देशाचा आठ कोटी कुटुंबांचा उदरनिर्वाह पशुधनावर चालतो असं मोदी म्हणाले होते. दरम्यान, सपाचे नेते अखिलेश यादव यांनी दावा केला होता की, भाजपच्या राजनितीमुळे प्रदेशातील लाखो भटक्या जनावारांनी शेतकऱ्यांचं स्वप्न तुटलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा : ITR Filing : ३१ डिसेंबरची आयटी रिटर्न्स डेडलाइन चुकली?, तर जाणून घ्या शेवटचा पर्याय


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -