घरBudget 2024GST Collection : जानेवारीत जीएसटी संकलनात दमदार वाढ, अर्थसंकल्पापूर्वीच चांगली बातमी

GST Collection : जानेवारीत जीएसटी संकलनात दमदार वाढ, अर्थसंकल्पापूर्वीच चांगली बातमी

Subscribe

नवी दिल्ली – देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच एक चांगली बातमी समोर आली आहे. जानेवारी महिन्यातील वस्तू आणि सेवा कर (GST) महसूल संकलनात 10.4 टक्के वाढ नोंदवली गेल्याची माहिती अर्थमंत्रालयाने दिली. यासोबतच संकलनाने १.७२ लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. हे आजपर्यंतचे दुसरे सर्वात मोठे मासिक संकलन आहे. तर जीएसटी संकलनामध्ये तिसऱ्यांदा 1.70 लाख कोटी रुपयांचा आकडा पार झाला आहे.

हेही वाचा – पंतप्रधान मोदींची वीज बील शुन्यावर आणण्याची नवी योजना; कुठे, कसा आणि कोण करु शकणार अर्ज?

- Advertisement -

अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी जीएसटी कर संकलनावर आनंद व्यक्त केला आहे. जीएसटी कर संकलनातील वाढ ही भारतीय अर्थव्यवस्था मजबूत होत असल्याचे संकेत असल्याचे सीतारमन यांनी म्हटले. सरकारकडून जीएसटी कर प्रणाली आणखी सुलभ करण्यासाठी प्रतिबद्ध असल्याचे त्यांनी म्हटले.

एप्रिल 2023-जानेवारी 2024 या कालावधीत GST संकलनात वार्षिक 11.6% वाढ झाली आहे. यासह, चालू आर्थिक वर्षातील संकलन 16.69 लाख कोटींवर पोहोचले आहे. एका वर्षापूर्वी याच कालावधीत (एप्रिल 2022-जानेवारी 2023) 14.96 लाख कोटी रुपये जमा झाले होते. या अधिकच्या कर संकलनामुळे मोठ्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांवर खर्च करण्यास वाव मिळणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Petrol Diesel Rate: ‘पेट्रोल-डिझेल 10 रुपयांनी होणार स्वस्त? सरकारी ऑइल कंपनीनं स्पष्टच सांगितलं

जानेवारी 2024 मध्ये कोणाचे GST कर संकलन किती?

सीजीएसटी           ₹31,844 कोटी
एसजीएसटी          ₹39,476 कोटी
आईजीएसटी         ₹89,989 कोटी
सेस                  ₹10,701 कोटी

जीएसटी संकलन महत्त्वाचे का ?

सरकारच्या महसुलाचा एक महत्त्वाचा स्रोत असल्याहे जीएसटी संकलन महत्त्वाचे आहे. याबरोबरच शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधा यासारख्या विविध सरकारी कार्यक्रम आणि योजनांना निधी देण्यासाठी GST संकलन सरकारच्या तिजोरीत वापरले जाते. महत्त्वाचे म्हणजे, जीएसटी कर संकलनातील वाढ ही अर्थव्यवस्थेतील वाढ दर्शवते. जेव्हा GST संकलन वाढते तेव्हा लोक जास्त खर्च करत असल्याचे दिसून येते, थोडक्यात, अर्थव्यवस्थेला चालना मिळते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -