Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश IIT मद्रासच्या वसतिगृहाच्या खोलीत विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला; या वर्षातील चौथी घटना

IIT मद्रासच्या वसतिगृहाच्या खोलीत विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला; या वर्षातील चौथी घटना

Subscribe

नवी दिल्ली : तामिळनाडूतील चेन्नई येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (IIT Madras) कॅम्पसमधील वसतिगृहाच्या खोलीत पुन्हा एकदा आत्महत्येची घटना समोर आली आहे. वसतिगृहाच्या खोलीत एका विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला असला तर पोलीसांना आत्महत्या नसल्याचा संशय आहे. आयआयटी मद्रासमध्ये विद्यार्थ्याने आत्महत्येची ही वर्षातील चौथी घटना असून 2018पासून आत्महत्येची ही 12वी घटना आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसतिगृहाच्या खोलीत मृतावस्थेत सापडलेला विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी होता. तो आयआयटी मद्रासमध्ये केमिकल इंजिनीअरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. हे प्रकरण आत्महत्येचे दिसत असले तरी पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. या वर्षात वसतिगृहातील विद्यार्थ्याच्या आत्महत्येची चौथी घटना आहे. त्यामुळे आयआयटी मद्रास कॅम्पसची अंतर्गत परिस्थिती आणि अभ्यासाचे दडपण याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

- Advertisement -

आयआयटीतील चौथी घटना आत्महत्या
यापूर्वी 14 मार्च रोजी बीटेक तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्याने आयआयटी मद्रासच्या कॅम्पसमध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती. वैपू पुष्पक श्री साई असे मृताचे नाव होते आणि तो तो आंध्र प्रदेशचा रहिवासी होता, तर एप्रिलच्या 2 तारखेला सचिन कुमार जैन (32) याने आत्महत्या केली होती. तो पश्चिम बंगालचा रहिवासी होता. तो आयआयटी मद्रासच्या पीएचडीच्या वर्गात शिकत होता.

- Advertisement -

सविस्तर बातमी लवकरच

- Advertisment -