Tuesday, February 23, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी भारतात कोरोना व्हायरसचे ७६८४ व्हेरीएंट, नव्या संशोधनात ही राज्ये सर्वाधिक आघाडीवर

भारतात कोरोना व्हायरसचे ७६८४ व्हेरीएंट, नव्या संशोधनात ही राज्ये सर्वाधिक आघाडीवर

Related Story

- Advertisement -

संपुर्ण भारतातून कोरोनाच्या व्हायरससाठी गोळा केलेल्या नमुन्यांमध्ये ७६८४ वेरीएंट आढळले असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका शोधनिबंधामध्ये व्हायरल वेरीएंटचा अभ्यास प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामध्ये ६१ प्रकारच्या विभिन्न अशा भारतीय वेरीएंटचाही समावेश आहे. जेनोमिक म्युटेशन तसेच व्हायरल प्रोटीनशी संबंधीत अमिनो अॅसिडमधील बदल पाहता हे बदल झाल्याचे आढळले आहे. SARS-COV-2 जिनॉमिक्स, एन इंडियन परस्पेक्टीव्ह ऑन सिक्वेन्सिंग व्हायरल वेरीएंट या अभ्यासात ही माहिती प्रसिद्ध करण्यता आली आहे. हैद्राबादच्या सेल्यूलर एण्ड मॉलेक्युलर बायोलॉजीच्या संशोधकांनी हा अभ्यास प्रसिद्ध केला आहे. या अभ्यासाचा उद्देश हा नवीन आणि नव्याने उद्भवलेल्या स्ट्रेनचा अभ्यास करणे होता. अभ्यासाच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर उद्भवणारे नवीन आजारांची लक्षणे जाणून घेणे हा उद्देश होता.

अभ्यासामध्ये असे आढळले आहे की SARS-CoV-2 या कोरोना व्हायरस अधिक इन्फेक्शियस म्हणजे कोरोनाचा अधिक प्रसार करणारा असा आहे. या व्हायरसमध्ये अडॅप्टिव्ह म्युटेशनची शक्यता असल्याने हा अतिशय धोकादायक आहे. त्यामुळेच कोरोनाच्या लशीचा गंभीर परिणाम किंवा त्याचे उलट परिणामही दिसू शकतात. परिणामी मृत्यूदर आणखी वाढण्याची शक्यता या अभ्यासातून वर्तवण्यात आली आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोना व्हायरसचा म्युटंट व्हेरीएशन कोरोनाची आकडेवारी वाढवण्यासाठी कारणीभूत ठरत आहे. त्यामध्येच हा अभ्यास अतिशय महत्वाचे असल्याचे बोलले जात आहे. सध्या देशात अनेक राज्यांमध्ये वाढणाऱ्या कोरोनाच्या आकडेवारीला व्हायरस व्हेरीएंट हेच कारण असल्याची भीती वर्तवली जात आहे.

- Advertisement -

या संशोधन प्रबंधाच्या माध्यमातून जगभरात वाढणाऱ्या कोरोनाच्या आकडेवारीची कारणेही सांगण्यात आली आहे. या अभ्यासात युके, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, नायजेरीयन व्हेरीएंटचाही समावेश आहे. अभ्यासामध्ये आंध्रप्रदेश येथे सर्वाधिक आढळलेला N440K या कोरोना वेरीएंटचाही समावेश आहे. अभ्यासाठी घेण्यात आलेल्या कोरोना म्युटेशन व्हेरीएंटमध्ये ४२ टक्के नमुने हे आंध्रप्रदेशातील तर ३ नमुने हे महाराष्ट्रातून आहे. भारतात ६१ अशा पद्धतीच्या व्हेरीएंटमध्ये कोणतही साम्य आढळलेले नाही. त्यामधील अनेक व्हेरीएंट हे नवीन आहेत. पण या व्हेरीएंटमुळे कोरोना रूग्णांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोरोनाचे नवीन रूग्ण वाढत असतानाच आता कोरोना दुसऱ्या वर्षातही सक्रीय आहे हे लक्षात घ्यायला हवे असे अभ्यासात नमुद करण्यात आले आहे. जसजशा नवनव्या कोरोनाच्या लशी येतील तसतसा नव्याने समोर येणाऱ्या कोरोनाच्या वेरीएंटचा धोका असल्याचेही अभ्यासात नमुद करण्यात आले आहे.


 

- Advertisement -