घरCORONA UPDATEकोरोनाचा सामुदायिक प्रसार होतोय का? ७५ जिल्ह्यांवर ICMR करणार अभ्यास

कोरोनाचा सामुदायिक प्रसार होतोय का? ७५ जिल्ह्यांवर ICMR करणार अभ्यास

Subscribe

आयसीएमआर कोरोना विषाणूचा सामुदायिक प्रसाराचा धोका सुरु झाला का? यासाठी ७५ जिल्ह्यांचा अभ्यास करणार आहे. ELISA (एन्जाइमलिंक्ड इम्युनोसोर्बेट असे) टेस्ट किटच्या सहाय्यानं हा अभ्यास केला जाणार आहे.

भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद (आयसीएमआर) कोरोना विषाणूचा सामुदायिक प्रसाराचा धोका सुरु झाला का? याबाबत जाणून घेण्यासाठी ७५ जिल्ह्यांचा अभ्यास करणार आहे. यासाठी तयारी पूर्ण केली आहे. देशात कोरोना विषाणूचा सामुदायिक प्रसारण सुरू झालं आहे की नाही हे शोधण्याचा त्यांचा हेतू आहे? रॅपिड अँटीबॉडी टेस्ट किटसच्या सहाय्यानं चाचणी करण्याची तयारी अधिकाऱ्यांनी केली होती. परंतु, या किटसच्या निकालांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यानं ही योजना स्थगित करण्यात आली. आता ELISA (एन्जाइमलिंक्ड इम्युनोसोर्बेट अॅसे) टेस्ट किटच्या सहाय्यानं हा अभ्यास केला जाणार आहे. ELISA किटही व्यक्तीच्या रक्तातील अँटीबॉडीच्या सक्रियतेचा शोध लावण्यासाठी वापरल्या जात आहेत. देशात कोरोनाचा सामूहिक प्रसाराचे पुरावे अजूनही मिळालेले नाहीत, असं आयसीएमआरनं म्हटलं. निकाल स्वतंत्रपणे आल्यास तपास प्रक्रिया थांबविली जाईल. ते म्हणाले की रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये निवडक लोकांची तपासणी केली जाईल आणि या लोकांमध्ये अँटीबॉडीज आहेत का ते पाहिलं जाईल.

देशातील कोरोनाबाधितांची संख्या जवळपास ६० हजारांपर्यंत पोहचली आहे. देशातील २०० हून अधिक जिल्हे सध्या कोरोनामुक्त आहेत. तर काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचं संक्रमण जोरात सुरु आहे. देशातील जवळपास ७५ जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या अधिक असल्याचं आढळून आलं आहे. भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदने (ICMR) आता या ७५ जिल्ह्यांचा अभ्यास सुरू करण्याची योजना बनवलीय. त्यामुळे या जिल्ह्यांत करोनाच्या सामुदायिक प्रसाराचा धोका सुरू झालाय का? याबद्दल अभ्यास केला जाणार आहे. दरम्यान, या ७५ जिल्ह्यांचा रेड झोनमध्ये समावेश आहे. यामध्ये दिल्लीचे सर्व जिल्हे, मुंबई, पुणे, ठाणे, आग्रा, अहमदाबाद यांसारख्या शहरांचा यामध्ये समावेश आहे.

- Advertisement -

हेही वाचा – कोरोनाच्या भीतीपोटी जिवंत प्राण्यांची बाजारपेठ बंद करण्याची गरज नाही – WHO


पुढील आठवड्यात येणार निकाल

आयसीएमआर वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार, या तपासणीचा एकच हेतू म्हणजे लोकांमध्ये विषाणूविरूद्ध अँटीबॉडीज तयार करण्यात आले आहेत की नाही हे तपासणे. पुढील आठवड्यात निकाल येईल, अशी अपेक्षा आहे. जर ELISA चाचणीने रक्तातील अँटीबॉडीज तयार होत आहेत, असं आढळून आलं, तर असं गृहित धरलं जाईल की संबंधित व्यक्तीस संसर्ग झाला आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -