घरताज्या घडामोडीचोली के पिछे गाण्यासाठी सुभाष घईंनी हेवी पॅडेड ब्रा घालायला सांगितला -...

चोली के पिछे गाण्यासाठी सुभाष घईंनी हेवी पॅडेड ब्रा घालायला सांगितला – नीना गुप्ता

Subscribe

नीना गुप्ता यांच्या ऑटोबायोग्राफीतून बॉलिवूडमधील चित्रपटांचे अनेक किस्से समोर येत आहेत. या ऑटोबायोग्राफीतून आणखी एक किस्सा समोर आला आहे तो म्हणजे चोली के पीछे क्या है या गाण्याच्या चित्रीकरणाचा. वर्ष १९९३ मध्ये सुभाष घई यांनी डायरेक्ट केलेल्या खलनायक चित्रपटाचा हा किस्सा आहे. नीना गुप्ता यांनी सच कहू तो या ऑटोबायोग्राफीतून या खलनायक चित्रपटातील गाण्याचा एक किस्सा सांगितला आहे. आपल्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल्स अशा दोन्ही प्रकारच्या स्ट्रगलचा उलगडा त्यांनी या ऑटोबायोग्राफीच्या निमित्ताने केला आहे. चोली के पिछे क्या है या गाण्याच्या चित्रिकरणाच्या दरम्यान सुभाष घई यांनी पॅडेड ब्रा घालण्याची मागणीही या ऑटोबायोग्राफीच्या निमित्ताने एका किश्श्याच्या स्वरूपात समोर आली आहे. पण या पॅडेड ब्राच्या मागणीमुळे अतिशय लज्जास्पद असा अनुभव आल्याचेही नीना गुप्ता म्हटले आहे. सुभाष घई यांना हेवी पॅडेड ब्रा या गाण्याच्या चित्रिकरणादरम्यान अपेक्षित होता.

जेव्हा पहिल्यांदा मी हे गाणे एकले तेव्हा मला गाण खूपच आकर्षित करणारे असे वाटले. पण सुभाष घई यांनी या गाण्यातली भूमिका नीना गुप्तांना सांगितली तेव्हा मात्र सर्व उत्साहच मावळल्याचा अनुभव नीना गुप्तांनी सांगितला आहे. पण एक चांगली गोष्ट झाली ती म्हणजे या गाण्यासाठी मला इला अरूणचा आवाज मिळाला. इला अरूणसोबत मी अनेक चित्रपटात काम केले होते. गाण्याच्या चित्रीकरणासाठी मला गुजरातच्या आदिवासी महिलेचा पेहराव करण्यासाठी सांगण्यात आले. त्यानंतर या संपुर्ण पेहरावासह मला सुभाष घई यांच्याकडे या पेहरावाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आले. पण सुभाष घई यांची मला पाहताच पहिली प्रतिक्रिया होती, नाही… नाही… नाही. मला पाहताच ते म्हणाले कुछ तो भरो. मला सुभाष घई यांच्या कमेंटनंतर खूपच लज्जास्पद वाटले.

- Advertisement -

कुछ तो भरो…

कुछ तो भरो हे त्यांनी माझ्या चोळीच्या पेहरावासाठी सांगितले होते आणि त्या चोळीत काही तरी भरण्याची गरज आहे, असा माझा मीच अंदाज त्यावेळी बांधला. हे सगळ वैयक्तिक स्वरूपाच अस नव्हत. पण नक्कीच डायरेक्टर म्हणून त्यांना चित्रीकरणाच्या निमित्ताने काही तरी अपेक्षित असेल असा अंदाज धरूनच मी त्याकडे पाहिले. काही कारणामुळे त्यादिवशी गाण्याचे शूटिंग झाले नाही. पण दुसऱ्या दिवशी मात्र मी सुभाष घईंसमोर एका वेगळ्याच पेहरावात हजर झाले. एक हेवी पॅडेड ब्रा घालून मी त्यांच्यासमोर हजर झाले, माझा नवा पेहराव पाहून त्यावेळी मात्र सुभाष घई समाधानी झाले. सुभाष घई हे त्यांनी चित्रपटाच्या माध्यमातून जे दाखवायचे आहे, त्यासाठी अतिशय स्पष्टपणे काम करणारे होते. त्यांना जे चित्रपटात दाखवायचे आहे त्याच पद्धतीने गोष्टींवर काम करून घेण्याचे कौशल्य असलेला हा डायरेक्टर असल्याचेही नीना गुप्ता यांनी ऑटोबायोग्राफीतून सांगितले आहे.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -