नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापू लागलेले असतानाच काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वाचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना स्मरणपत्र पाठवून राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वाबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यास सांगितले आहे.
हेही वाचा – भाजपाच्या लोकांना चांगले दिवस आले; कॅसिनो प्रकरणी संजय राऊतांचा पुन्हा हल्लाबोल
राहुल गांधी हे ब्रिटिश नागरिक असल्याचा दावा माजी केंद्रीय मंत्री सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी यासंदर्भात 6 ऑगस्ट 2019 रोजी तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे पत्र दिले होते. या पत्राच्या आधारे गृह मंत्रालयाने राहुल गांधी यांना दुहेरी नागरिकत्वाच्या मुद्द्यावर नोटीस बजावून 15 दिवसांच्या आत ‘वास्तविक स्थिती’ स्पष्ट करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, त्यावेळी काँग्रेसने राहुल गांधी यांच्यावरील हे सर्व आरोप खोटे असल्याचा दावा केला होता.
Dr #SubramanianSwamy 𝐖𝐫𝐢𝐭𝐞𝐬 𝐭𝐨 𝐇𝐨𝐦𝐞 𝐌𝐢𝐧𝐢𝐬𝐭𝐞𝐫 @AmitShah @AmitShahOffice @HMOIndia to 𝐀𝐜𝐭 𝐎𝐧 𝐂𝐢𝐭𝐢𝐳𝐞𝐧𝐬𝐡𝐢𝐩 𝐈𝐬𝐬𝐮𝐞 𝐨𝐟 #𝐑𝐚𝐡𝐮𝐥𝐆𝐚𝐧𝐝𝐡𝐢 that has been 𝐛𝐥𝐨𝐜𝐤𝐞𝐝 𝐛𝐲 @narendramodi 𝐛𝐲 𝐧𝐨𝐭 𝐚𝐜𝐭𝐢𝐧𝐠 𝐨𝐧 𝐜𝐨𝐦𝐩𝐥𝐚𝐢𝐧𝐭… pic.twitter.com/hN0o45AeUy
— Tejas (@NAVANGULTEJAS) November 21, 2023
आता चार वर्षांनंतर पुन्हा एकदा सुब्रमण्यम स्वामी यांनी पुन्हा एकदा हा मुद्दा उपस्थित केला आहे. विद्यमान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून आपल्या आधीच्या पत्राला उत्तर मिळाले नसल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. आपण ब्रिटिश नागरिक असून आपल्याकडे ब्रिटनचा पासपोर्ट असल्याचे राहुल गांधी यांनी आपणहून ब्रिटन सरकारला सांगितले आहे. त्यानुसार, भारतीय नागरिक म्हणून त्यांनी भारतीय नागरिकत्व कायद्याचे (अनुच्छेद 9) उल्लंघन केले आहे. त्यामुळे राज्य घटना आणि कायद्यानुसार त्यांनी भारतीय नागरिकत्व आपोआपच गमावले असल्याचा दावा सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे.
हेही वाचा – 2024ला आम्हीच जिंकू, असे सांगणाऱ्यांना…; ठाकरे गटाचा भाजपावर निशाणा
आपण यासंदर्भात पत्र पाठवून चार वर्षे झाली असून दरम्यानच्या काळात दोन स्मरणपत्रेही पाठवली आहेत. आता हे माझे शेवटचे पत्र असून लवकरात लवकर यावर निर्णय घ्यावा. जेणेकरून याविषयी पुढे काय पावले उचलायची, हे मला ठरविता येईल, असे स्वामी यांनी आता अमित शहा यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
सुब्रमण्यम स्वामी यांचा दावा
एका ब्रिटिश कंपनीच्या 10 ऑक्टोबर 2005 आणि 31 ऑक्टोबर 2006 रोजी भरलेल्या वार्षिक टॅक्स रिटर्नमध्ये राहुल गांधी यांची जन्मतारीख 19 जून 1970 दर्शविली असून त्यात राहुल गांधी हे ब्रिटिश नागरिक असल्याचा उल्लेख करण्यात आला असल्याचे स्वामी यांचे म्हणणे आहे.