घरदेश-विदेशबाबो, अडीच लाखांचा आंबा, शेतकरी झाला मालामाल

बाबो, अडीच लाखांचा आंबा, शेतकरी झाला मालामाल

Subscribe

बिहारमधील कटीहार येथे एका शेतकऱ्याने मात्र कमाल केली आहे. त्याने पिकवलेल्या आंब्याची देशभरात चर्चा होत आहे.

एकीकडे नैसर्गिक संकट आणि कर्जामुळे शेतकरी आत्महत्या करत असल्याचे दाहक वास्तव समोर येत असतानाच बिहारमधील कटीहार येथे एका शेतकऱ्याने मात्र कमाल केली आहे. प्रशांत चौधरी असे त्याचे नाव असून त्याने पिकवलेल्या आंब्याची देशभरात चर्चा होत आहे. कारण या आंब्याची किंमत आंतराराष्ट्रीय बाजारात अडीच लाख रुपये किलो एवढी आहे. यामुळे प्रशांत मालामाल झाला असून सर्वच शेतकऱ्यांनी हा आंबा लावावा असे आवाहन त्याने केले आहे.

प्रशांत हा एमआयटी पदवीधारक असून दिल्लीत त्याने कंम्प्युटर इंजिनियर ची नोकरीही केली आहे. मात्र नोकरीतून फार पैसे मिळत नसल्याने तो गावी परतला. त्यानंतर गावच्या १५ एकर जमीनीवर त्याने एकच पिक न घेता वेगवेगळे पिक कसे घेता येईल याचा अभ्यास केला. नंतर त्याने या जमिनीवर पेरु, लिंबू, पपई, कॉफी, आंबा, सफऱचंद, वेलची, संत्री, जपानी लीची, काळी मिरी, काळी हळद, भारतीय चंदन यासारखे पिक घेण्यास सुरुवात केली. त्याने आंब्याचे मियाजाकी नावाचे झाड लावले. या आंब्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी मागणी असून अडीच लाख रुपये किलो दराने तो विकला जातो.

- Advertisement -

जपानच्या मियाजाकी शहरात या आंब्याचे पिक घेतले जाते. यामुळे या आंब्याला शहराचेच नाव देण्यात आले आहे. या आंब्यात अँटी ऑक्सीडेंट, बीटा कैरोटी आणि फोलिक अॅसिड यासारखे गुण असतात.तर यात साखरेचे प्रमाण१५ ट्कके अधिक असते. या आंब्यासाठी कडक उन आणि भरपूर पाऊस गरजेचा असतो. प्रशांतने यावर अभ्यास करुनच मियाजाकी आंब्याची लागवड केली. तसेच असेच नवीन प्रयोग त्याला करायला आवडतात. यामुळे त्याने याच आवडीतून हिमाचल प्रदेशमधील सफरचंद बिहारमध्ये लावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. विशेष म्हणजे प्रशांत सर्व पिकांसाठी ऑर्गेनिक खतांचा वापर करत आहे. यामुळे दिवसेंदिवस प्रशांतच्या मालाला देशातच नाही तर परदेशातही मागणी वाढत आहे.

 

- Advertisement -

 

 

 

 

 

 

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -