आयआयटी मद्रासमध्ये 5G ची यशस्वी चाचणी

Successful testing of 5G at IIT Madras
Successful testing of 5G at IIT Madras

आयआयटी मद्रासमध्ये 5G सेवेचे यशस्वी परीक्षण करण्यात आले. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पहिला 5G व्हॉईस आणि व्हिडीओ कॉल केला. या 5G कॉलचा टेस्टिंग व्हिडीओ केंद्रीय मंत्र्यानी त्यांच्या ट्विटरवर शेअर केला आहे. या सेवेचे एन्ड टू एन्ड नेटवर्क भारतात तयार करण्यात आले आहे.

मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी सप्टेंबर ते ऑक्टोबरपर्यंत भारतामध्ये स्वदेशी 5G चा आराखडा तयार करण्यात येईल. हा स्वदेशी आराखडा भविष्यातील अफाट यशाचे प्रतिक असेल, असे ट्राय कडून आयोजित एका कार्यक्रमात सांगितले होते.

 

5G सेवा सुरू झाल्यानंतर या तंत्रज्ञानाचा भारताला मोठा फायदा होणार आहे. स्वदेशी 5G तंत्रज्ञान स्वदेशी 5G खाजगी कंपन्यांना जागतिक बाजारपेठेत आपले स्थान निर्माण करण्यास मदत करेल. देशातील पहिला 5G कॉल ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये सुरु करण्याचा प्रयत्न असेल. यासाठी जून ते जुलै दरम्यान स्पेक्ट्रम लिलाव प्रक्रिया घेण्यात येणार आहे. स्पेक्ट्रमचा लिलाव 20 वर्षांसाठी असेल किंवा 30 वर्षांसाठी असेल याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.