घरदेश-विदेशSudan Conflict : सुदानमध्ये 4 ते 11 मे दरम्यान युद्धबंदी, लष्कर -...

Sudan Conflict : सुदानमध्ये 4 ते 11 मे दरम्यान युद्धबंदी, लष्कर – निमलष्करी दलामध्ये करार

Subscribe

नवी दिल्ली : सुदानमध्ये (Sudan) गेल्या काही दिवसांपासून युद्धग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीतून तेथील नागरिकांना काही दिलासा मिळणार आहे. कारण सुदानमधील लष्कर (Army) आणि निमलष्करी (Paramilitary ) दल आरएसएफ यांच्यात सात दिवसांच्या युद्धविरामावर सहमती झाली आहे.

सुदानमध्ये सत्ता काबीज करण्यासाठी लष्कर आणि निमलष्करी दल यांच्यात संघर्ष सुरू आहे. या युद्धात आतापर्यंत 400 हून अधिक लोक मारले गेले आहेत, तर 3 लाखांहून अधिक लोक बेघर झाले आहेत. जुबा येथील दक्षिण सुदानच्या परराष्ट्र मंत्रालयाने 2 मे रोजी अधिकृत निवेदनात म्हटले की, युद्धविराम 4 ते 11 मे पर्यंत लागू असेल. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, दक्षिण सुदानचे अध्यक्ष सल्वा कीर मायार्डित यांच्याशी झालेल्या दूरध्वनी संभाषणात दोन्ही दलांनी युद्धविराम करण्यास सहमती दर्शविली. सुदान आर्म्ड फोर्सेस (एसएएफ) आणि रॅपिड सपोर्ट फोर्सेसचे (आरएसएफ) नेते जनरल मोहम्मद हमदान डगालो यांनी युद्धविरामास तत्वतः सहमती दर्शविली आहे. त्यांनी युद्धविराम कायमचा थांबावा यासाठी होणाऱ्या चर्चेसाठी आपल्या प्रतिनिधींची नावे देण्याचेही यावेळी मान्य केले आहे.

- Advertisement -

चर्चेची तारीख प्रस्तावित करण्याचे आवाहन केले
अध्यक्ष साल्वा कीर हे सुदानी नेत्यांशी चर्चा करणाऱ्या IGAD असेंब्ली ऑफ हेड्स ऑफ स्टेटच्या गटाचे नेते आहेत. त्यांनी सुदानी नेत्यांना सांगितले की, खार्तूममधील वेगाने बिघडत चाललेल्या मानवतावादी परिस्थितीमुळे तणाव वाढला आहे. त्यामुळे सुदानी नेत्यांनी त्यांच्या प्रतिनिधींची नावे द्यावी आणि शक्य तितक्या लवकर चर्चा सुरू करण्यासाठी प्रस्तावित तारीख  जाहीर करावी असे आवाहन, साल्वा यांनी केले आहे.

सुमारे 3000 परदेशी भारतीय देशात पोहोचले
लष्कर आणि निमलष्करी दलांमधील संघर्षामुळे सूदानमध्ये गृहयुद्ध भडकले आहे. तिथे अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी भारत सरकारकडून ऑपरेशन कावेरी सुरु आहे. या ऑपरेशन अंतर्गत परदेशात अडकलेल्या भारतीयांना सुरक्षितरत्या मायदेशात आणले जात आहे. नुकताच त्याठिकाणी अडकलेल्या 116 भारतीयांना घेऊन 20वी तुकडी भारतीय हवाई दलाच्या C-130J विमानाने पोर्ट सुदानहून जेद्दाहला पोहोचली आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, सुमारे 3000 परदेशी भारतीय देशात पोहोचले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -