Friday, April 16, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश Suez Canal Logjam : जागतिक व्यापाराला मोठा दिलासा, सुएझ कालव्यातील एव्हर गिव्हन...

Suez Canal Logjam : जागतिक व्यापाराला मोठा दिलासा, सुएझ कालव्यातील एव्हर गिव्हन जहाज अखेर मार्गस्थ

Related Story

- Advertisement -

इजिप्तमधील सुएझ कालव्यात अडकलेले मालवाहतूक जहाज अखेर सुखरुप मार्गस्थ झाले आहे. त्यामुळे पूर्व- पश्चिम सागरी मार्गावरील जागतिक वाहतुक पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे. यामुळे जागतिक व्यापाराला मोठा दिलासा मिळणार आहे. सुएझ कालव्यात अडकलेल्या एव्हर गिव्हन जहाजामुळे गेल्या पाच दिवसांपासून सागरी मार्गावरील मालवाहतुक ठप्प झाली होती.

सुएझ या महाकाय कालव्यातून दररोज ५० मालवाहू जहाजे मार्गस्थ होतात. यात २३ मार्चला एव्हर गिव्हन हे महाकाय जहाज सुएझ कालव्यात अडकून पडले होते. या मार्गावर उठलेल्या वादळामुळे हे जहाज तिरकं झालं होतं. त्यामुळे मोठी सागरी वाहतूक कोंडी झाली होती. अखेर पाच दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर महाकाय जहाजाला कालव्याच्या गाळातून बाहेर काढण्यात यश आले आहे. आत्तापर्यंत याठिकाणी ४५० हून अधिक जहाजे अडकली आहेत. त्यामुळे हा मार्ग पुन्हा सुरु होण्यासाठी अधिक काळ जाणार असल्याची शक्यता आहे. रॉयटर्सने केप शिपिंग सर्व्हिसेसच्या हवाल्याने या जहाजाला बाहेर काढण्यात आल्याचं वृत्त दिलं आहे.

- Advertisement -

बर्नहार्ड शुल्ट जहाज व्यवस्थापन कंपनीचे तंत्रज्ञान व्यवस्थापक एव्हर गिव्हन यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी हे जहाज काढण्याचे प्रयत्न करण्यात आले परंतु यश आले नाही. यानंतर रविवारी या महाकाय जहाजाला हटवण्यासाठी जहाजाच्या आतल्या भागात पाणी टाकत विशेष यंत्राचा वापर करण्यात आले. तसेच मोठे जहाज अडकल्यानंतर त्यांना बाहेर काढण्यासाठी वापरण्याच येणाऱ्या विशेष जहाजांचा वापर करण्यात आला. या जहाजांच्या मदतीने अखेर हजारो कंटेनर असणारे हे जहाज सुखरुप बाहेर आले आहे.

सुएझ कालवा प्राधिकरणानेही जहाज कालव्यातून बाजूला हटवण्यासाठी दोन वेळा प्रयत्न केले. यावेळी शनिवारी भरतीच्या लाटांच्या मदतीने अनेक प्रयत्न करण्यात आले. यासाठी जपानच्या शोई कायसन केके कंपनीच्या १० जहाजांची मदत घेण्यात आली. हे महाकाय जहान तरंगू शकले नाही तर यातील कंटेनर्स वेगळे करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु असे करणे अवघड असल्याचे शोई कायसन केके कंपनीचे अध्यक्ष युकिटो हिगाकी यांनी सांगितले. आता हे जहाज काढल्यानंतर इतर गोष्टींची चाचणी करून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.


- Advertisement -

 

 

- Advertisement -