Friday, April 16, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश Suez canal: भारतीय कर्मचाऱ्यांवर होणार कायदेशीर कारवाई?

Suez canal: भारतीय कर्मचाऱ्यांवर होणार कायदेशीर कारवाई?

Related Story

- Advertisement -

इजिप्तमधील सुएझ कालव्यात अडकलेले मालवाहतूक जहाज सोमवारी अखेर सुखरुप मार्गस्थ करण्यात आले आहे. २३ मार्चला एव्हर गिव्हन हे महाकाय जहाज सुएझ कालव्यात अडकून पडले होते. यामुळे पूर्व- पश्चिम सागरी मार्गावरील जागतिक वाहतूक पुन्हा सुरू होणार असल्याने जागतिक व्यापाराला मोठा दिलासा मिळाला आहे. जगातील महत्त्वपूर्ण जलमार्गांवरील संकट संपले असले तरी यामुळे दररोजच्या कोट्यवधी डॉलर्सचे नुकसान झाले असल्याचे सांगितले जात आहे. यासह भारतीय क्रू मेंबरवर (भारतीय कर्मचारी) कारवाईचा धोका असल्याचे सांगितले जात आहे. वारा, खराब हवामान, जहाज अडकण्यामागे इतर काही मानवी चुका आहेत काय? त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार का? याची देखील चौकशी करण्यात येणार आहे.

सुईझ कालवा प्राधिकरण सर्व क्रू भारतीयांशी कसे वर्तवणूक करतात हे पाहणे महत्त्वाचं असणार आहे. यादरम्यान, भारतीय क्रू मेंबर्सना कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जावे लागू शकते, अशी भारत सरकारला कल्पना आहे. या सर्व भारतीय क्रू मेंबर्सवर फौजदारी खटला चालवण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकरणाची तपासणी सुरू असेपर्यंत कॅप्टन आणि क्रू मेंबर्सना बाहेर जाण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. जोपर्यंत घटनेचा पूर्ण तपास केला जात नाही तोपर्यंत त्यांना हाऊस अरेस्ट म्हणूनही ठेवले जाऊ शकते. दरम्यान, जहाज कंपनीकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया अद्याप देण्यात आलेली नाही.

- Advertisement -

राष्ट्रीय नौपरिवहन बोर्डाचे सदस्यांनी दिलेल्या माहिती नुसार, इतके मोठे आधुनिक जहाज कसे अडकले याचा शोध घेतला पाहिजे. सागरी प्रवासाच्या डेटा रेकॉर्डरशी संभाषण ऐकल्यानंतर त्यामागील नेमकं कारण शोधण्यासाठी त्या डेटाची तपासणी केली जाणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.


Suez Canal Logjam : जागतिक व्यापाराला मोठा दिलासा, सुएझ कालव्यातील एव्हर गिव्हन जहाज अखेर मार्गस्थ
- Advertisement -