घरदेश-विदेशकाबुलमध्ये आत्मघाती हल्ला; २५ जण ठार तर २३ जखमी

काबुलमध्ये आत्मघाती हल्ला; २५ जण ठार तर २३ जखमी

Subscribe

काबुलमध्ये आत्मघाती हल्ला करण्यात आला आहे. काबुलमध्ये दश्त-ए-बरची भागामध्ये आत्मघाती हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यामध्ये २५ जणांचा मृत्यू झाला आहे तर २३ जण गंभीर जखमी झाले आहेत.

अफगाणिस्तान पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाने हादरले आहे. अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये दश्त-ए-बरची भागामध्ये आत्मघाती हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यामध्ये २५ जणांचा मृत्यू झाला आहे तर २३ जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान घटनास्थळी पाकिस्तानच्या सैन्यांनी घेराव घातला आहे. हा आत्मघाती हल्ला नेमका कोणी केला हे अद्याप स्पष्ट झाले नाही मात्र याचा तपास सुरु आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, काबुलच्या दश्त-ए-बरची भागामद्ये मावौद अकादमीच्या बाहेर हा आत्मघाती हल्ला करण्यात आला आहे. हा बॉम्बस्फोट ऐवढा मोठा होता की, किलोमीटरपर्यंत त्याचा आवाज ऐकू आला. या हल्ल्यामध्ये २५ जणांचा जागीच मृत्यू झाला तर २३ जण गंभीर जखमी झाले. जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या सर्वांची प्रकृती चिंताजनक आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -