कोर्ट कॉम्प्लेक्सबाहेर एसपीओची आत्महत्या, सर्व्हिस रायफलने स्वतःवर झाडली गोळी

कोर्ट कॉम्प्लेक्सबाहेर एसपीओने आत्महत्या केली. त्यांनी सर्व्हिस रायफलने स्वतःवर झाडली गोळी झाडली.

rayfal

डोडा (जम्मू-कश्मीर) – सोमवारी डोडा येथे एका पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या सर्व्हिस रायफलने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना सत्र न्यायालय डोडा बाहेर घडली. गुरमेश सिंह (वय – 46) असे मृताचे नाव आहे. तो गंडोहचा रहिवासी होता. जम्मू-काश्मीर पोलिसात एसपीओ म्हणून कार्यरत होते.

पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. याप्रकरणी तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. एसपीओने कोणत्या कारणासाठी आत्महत्या केली याचा शोध घेतला जात आहे. त्याच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. दरम्यान एका पोलीस अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेला सांगितले की, गोळी एसपीओच्या छातीत लागली, त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. प्राथमिक तपासात त्यांनी आत्महत्या केली असावी, असे सांगितले जात आहे.

याआधी जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील एका छावणीत सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) कॉन्स्टेबलने स्वत:वर गोळी झाडली. यामुळे कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बीएसएफ जवान एन हजारिका (43) यांनी सकाळी 11.30 वाजता त्याच्या सर्व्हिस रायफलने स्वत:वर गोळी झाडली. एन हजारिका यांची एका शाळेत नियुक्ती करण्यात आली होती. शहीद जवान बीएसएफच्या 108 बटालियनच्या एफ कंपनीत तैनात होता.

एन हजारिका 2004 मध्ये बीएसएफमध्ये सामील झाले होते. ते आसामच्या जोरहाट जिल्ह्यातील होते. त्याने पुढे सांगितले की, स्वत:वर गोळी झाडल्यानंतर लगेचच जवानाच्या सहाय्यकांनी त्याला जवळच्या रुग्णालयात हलवले, जिथे पोहोचल्यावर त्याला मृत घोषित करण्यात आले.