घरदेश-विदेशसुखविंदरसिंह सुक्खू हिमाचल प्रदेशचे नवे मुख्यमंत्री, पहिल्याच कॅबिनेटमध्ये केली 'ही' घोषणा

सुखविंदरसिंह सुक्खू हिमाचल प्रदेशचे नवे मुख्यमंत्री, पहिल्याच कॅबिनेटमध्ये केली ‘ही’ घोषणा

Subscribe

सुखविंदर सिंग सुक्खू यांनी हिमाचल प्रदेशचे नवे मुख्यमंत्री म्हणून रविवारी (11 डिसेंबर) शपथ घेतली. शिमलाच्या रिज मैदानावर आज दुपारी 1.50 वाजता हा शपथविधी सोहळा पार पडला. यानंतर सुक्खू हे हिमाचलचे 15 वे मुख्यमंत्री बनले आहेत. सुक्खू यांच्यासह मुकेश अग्निहोत्री यांनी हिमाचल प्रदेशच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, हिमाचल प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा प्रतिभा सिंह यांच्यासह राहुल गांधी आणि प्रियांका गांधी उपस्थित होत्या.

- Advertisement -

पहिल्या कॅबिनेट बैठकीत महत्त्वाची घोषणा

सुक्खू यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर झालेल्या पहिल्याच कॅबिनेट बैठकीत दिलेली आश्वासने मी पूर्ण करणार असे आश्वासन देत, सर्वप्रथम जुनी पेन्श योजना राज्यात पुन्हा सुरु करणार अशी घोषणा केली आहे. यावेळी हिमाचल प्रदेशचे उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री म्हणाले की, पूर्वी लोक म्हणायचे की काँग्रेस कोणत्याही राज्यात सत्तेवर येणार नाही, पण आज आम्ही भाजपचा ‘रथ’ रोखला आहे.

दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रतिभा वीरभद्र सिंह यांनीही पक्षाचे नेते राहुल गांधी यांचे शिमल्यात स्वागत करत म्हटले की, आम्ही आश्वासन दिले होते की, आम्ही हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसला परत आणू, त्यावर राहुल यांनी त्यांचे अभिनंदन केले.

- Advertisement -

सुक्खू यांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथ सोहळ्यानंतर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी म्हणाल्या की, हिमाचलमध्ये काँग्रेसचे सरकार आल्याने आम्ही खूप आनंदी आहोत. जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करणे ही आता आपली सर्वात मोठी जबाबदारी आहे, जी लवकरच पूर्ण करण्यासाठी आपण आग्रही राहणार असल्याचे ते म्हणाले.

सुखविंदर सिंग सुक्खू यांच्या आईची प्रतिक्रिया

हिमाचल प्रदेशचे निवडून आलेले मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू यांनी आज शिमला येथे त्यांच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी संजौली हेलिपॅडवर त्यांची आई संसार देवी यांचे स्वागत केले. यावेळी आईने आपला मुलगा ‘सेवेदार’ असून त्याने राज्यातील जनतेची सेवा केली पाहिजे, असे आवाहन केले.

सखू यांनी घेतली प्रतिभा सिंह यांची भेट

शपथविधीसाठी सुरू असलेल्या तयारीदरम्यान मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू सकाळी 10.30 वाजता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष प्रतिभा सिंह यांच्या घरी हॉली लॉजवर पोहोचले. काँग्रेसचे कार्यकर्ते सकाळपासून हॉली लॉजवर जमले आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्यांना शपथविधीसाठी आमंत्रित केले.

सुक्खू चौथ्यांदा विधानसभेत

हिमाचल प्रदेशचे नवे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू हे चौथ्यांदा मुख्यमंत्री पदी विराजमान झाले आहेत, मुकेश अग्निहोत्री पाचव्यांदा विधानसभेत पोहोचले आहेत. यापूर्वी सुखविंदर सिंह सुक्खू यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, एनएसयूआयचे अध्यक्ष, शिमल्यातून दोन वेळा नगरसेवक, युवक काँग्रेस प्रमुथ आणि 2022 मध्ये निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष म्हणून निवडून आले होते.

हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूकीत काँग्रेसने 68 जागांपैकी 40 जागा जिंकल्या. मात्र हिमाचलमध्ये पंरपरा बदलाचा दावा करणाऱ्या भाजपला केवळ 25 जागा मिळाल्या. यामुळे हिमाचलमध्ये काँग्रेसची एकहाती सरकार स्थापन झाले.


कर्नाटकचे मुख्यमंत्री अतिशय माज आल्यासारखे बोलतात; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -