घरअर्थजगतसुंदर पिचाईंच्याही पगारात होणार कपात, उत्पन्नात किती फरक पडणार?

सुंदर पिचाईंच्याही पगारात होणार कपात, उत्पन्नात किती फरक पडणार?

Subscribe

नवी दिल्ली – जगभरात येऊ घातलेल्या आर्थिक मंदीमुळे अनेक जागतिक कंपन्यांनी कर्मचारी कपात आणि पगार कपातीला सुरुवात केली आहे. याचाच फटका आता गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांना बसणार आहे. कारण त्यांच्याही पगारात कपात करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. गुगलच्या कर्मचाऱ्यांबरोबर झालेल्या टाऊन हॉलमधील बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वेतनात कपात करण्यात येणार असल्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. व्हाइस प्रेसिडेंटपासून सर्व पदावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांबाबत हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सुंदर पिचाई यांचाही पगार आता कापून येणार आहे.

सुंदर पिचाई यांचा मासिक पगार अर्थातच आपल्या कल्पनेपलिकडचा असेल. इंटरनेटवरील विविध स्त्रोतांनी दिलेल्या माहितीनुसार, सुंदर पिचाईंचं वार्षिक उत्पन्न 242 मिलिअन डॉलर इतकं आहे. म्हणजेच, भारतीय चलनानुसार 19,794,874,000 रुपये एवढे असण्याची शक्यता आहे. तसंच, त्यांच्याकडे अल्फाबेटचेही शेअर्स आहेत.

- Advertisement -

त्यामुळे त्यांची अंदाजित संपत्ती १० हजार ८०० कोटीपेक्षाही जास्त असण्याची शक्यता आहे. सुंदर पिचाई यांच्या वेतनात गेल्याच वर्षी वाढ करण्यात आली होती. त्यानंतर, गुगलमध्ये कर्मचारी कपातीला सुरुवात झाली. मात्र, त्यांच्या पगारात आता कपात करण्यात येणार आहे. परंतु , किती रुपयांची कपात होईल हे सांगण्यात आलेले नाही.

सध्या पिचाई यांचे मासिक वेतन १६३ कोटी रुपये आहे. याशिवाय त्यांच्याकडे अल्फाबेटचे शेअर्सही आहेत. सुंदर पिचाई यांची अंदाजे एकूण संपत्ती 10,800 कोटी रुपये आहे. सीईओ म्हणून त्यांची कामगिरी उत्कृष्ट होती म्हणून 2019 मध्ये परफॉर्मन्स स्टॉक युनिट्स (पीएसयू) 43 टक्क्यांवरून 60 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आले.

- Advertisement -

IIFL Hurun India Rich List 2022 नुसार, पिचाई यांची एकूण संपत्ती 20 टक्क्यांनी घसरून ₹5,300 कोटी झाली, परंतु तरीही ते सर्वात श्रीमंत व्यावसायिक व्यवस्थापकांमध्ये गणले जातात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -