वयाच्या १३ वर्षापासून सुंदरलाल बहुगुणाने केली आंदोलनाची सुरुवात

Sunderlal Bahuguna started the movement from the age of 13
वयाच्या १३ वर्षापासून सुंदरलाल बहुगुणाने केली आंदोलनाची सुरुवात

चिपको आंदोलनाचे प्रणेते म्हणून ओळखले जाणारे आणि हिमालयाचे रक्षक म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करणारे सुंदरलाल बहुगुणा यांचे निधन झाले. बहुगुणा यांना ८ मे रोजी कोरोनाची लागण झाली होती त्यांच्यावर ऋषिकेशच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, आज अखेर त्यांची मृत्यूशी झुंज संपली. रुग्णालयात उपचार सुरु असतानाच त्यांनी वयाच्या ९४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. बहुगुणा यांच्याविषयी सांगायचे म्हणजे त्यांनी वयाच्या १३ व्या वर्षापासून आंदोलने करण्यास सुरुवात केली. त्यांना काहीतरी वेगळे करायचे होते. त्या दरम्यान, ते अमर शहीद श्रीदेव सुमन यांच्या संपर्कात झाले. त्यानंतर त्यांनी दारुबंदी, चिपको आंदोलने सुरु केली आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी अतुलनीय कामगिरी केली.

स्त्रियांच्या प्रश्नांवरही आवाज उठवला

उत्तराखंडच्या टिहरी येथे ९ जानेवारी १९२७ रोजी सुंदरलाल बहुगुणा यांचा जन्म झाला. त्यानंतर ते अमर शहीद श्रीदेव सुमन यांच्या संपर्कात आले. त्या दरम्यान, सुमन यांचे टिहरी सत्तेविरोधी चळवळ सुरु होती. त्यावेळेस सुमन यांनी बहुगुणी यांची प्रतिमा पाहून त्यांना काही पुस्तके वाचण्यास दिली. त्याचवेळी त्यांच्या मनात काहीतरी वेगळे करण्याचा विचार आला. १९४४ साली सुमन यांना तुरुंगात ठेवल्यानंतर त्यांनी सुमन यांची टिहरी सत्तेबाबत जी मत होती ती लोकांसमोर आणली आणि त्यानंतर त्यांनी आंदोलने करण्यास सुरुवात केली. त्यांनी केवळ पर्यावरणच नाही तर अस्पृश्यतेविरोधातही आंदोलने केली आणि त्यांनी स्त्रियांच्या प्रश्नांवरही आवाज उठवला.

वेष बदलून राहू लागले

दरम्यान, सुंदरलाल बहुगुणा हे पुढील शिक्षणासाठी लाहोरला गेले. त्यावेळी त्यांनी टिहरी पोलिसांपासून वाचण्यासाठी वेष बदलून राहण्यास सुरुवात केली. नंतर त्यांनी जून १९४७ साली लाहोर येथे बीएची पदवी घेतल्यानंतर ते पुन्हा टिहरी येथे परतले. त्यानंतर १४ जानेवारी १९४८ साली टिहरीची राजेशाही काढून त्याठिकाणी लोकशाहीचे सरकार स्थापन करण्यात आले. त्यात बहुगुणा यांना प्रचार मंत्र्यांची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर ते काही काळ काँग्रेसमध्ये राहिले. त्यानंतर १९५५ मध्ये गांधीजींच्या इंग्रजीच्या शिष्या सरला बहन यांच्या कौसानी आश्रमात शिकवणार्‍या विमला नौटियाल यांच्याशी त्यांचा संपर्क झाला. त्यानंतर विमला यांनी त्यांना लग्न करण्यासाठी राजकारण सोडवावे लागेल, अशी अट घातली. बहुगुणाने त्यांची अट मान्य केली आणि टिहरी गावापासून २२ मैलांच्या अंतरावर असलेल्या सिल्यारा गावातील एका झोपडीत राहिला गेले. त्यानंतर त्यांनी १९ जून १९५६ साली विमला यांच्याशी लग्न केले आणि तिचे आपला संसार मांडला.

चिपको चळवळीचे प्रणेते

सुंदरलाल बहुगुणा हे महात्मा गांधींच्या विचाराने प्रभावीत होते. त्यांनी आयुष्यभर गांधीवादाचा अंगिकार केला. तसेच ते ज्यावेळी आंदोलन करायचे त्यावेळी त्यांचा गांधीवाद डोकवायचा. तर ७०च्या दशकात त्यांनी पर्यावरणाच्या संरक्षणासाठी मोठी चळवळ सुरु केली होती. त्यानंतर या चळवळीचा परिणाम संपूर्ण देशभर झाला. या काळात त्यांनी वृक्ष संवर्धनासाठी चिपको आंदोलन सुरु केले आणि त्या आंदोलनाची जगाने दखल घेतली. वृक्षतोडीविरोधातील हे आंदोलन होते. दरम्यान, १९७४ साली शेकडो स्थानिक महिला वृक्षतोडीचा निषेध म्हणून झाडाला चिपकून उभ्या राहिल्या होत्या. त्यामुळे हे आंदोलन चिपको आंदोलन म्हणून गाजलं.


हेही वाचा – चिपको आंदोलनाचे नेते सुंदरलाल बहुगुणा यांचे कोरोनामुळे निधन; ९४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास