Wednesday, March 19, 2025
27 C
Mumbai
Homeदेश-विदेशSunil Gavaskar : ज्या भारतावर टीका करता त्याच्याच जीवावर तुमची..., इंग्लंडच्या खेळाडूंना गावस्करांनी सुनावले

Sunil Gavaskar : ज्या भारतावर टीका करता त्याच्याच जीवावर तुमची…, इंग्लंडच्या खेळाडूंना गावस्करांनी सुनावले

Subscribe

गावस्कर म्हणतात, जे खेळाडू भारताबाबत तक्रार करत आहेत, त्यांनी आपल्या देशाच्या विकासावर लक्ष केंद्रित करायला हवे. कारण, भारतीय क्रिकेटमुळेच त्यांना पगार मिळत असल्याचे त्यांनी सुनावले आहे.

Sunil Gavaskar On Champions Trophy 2025 : नवी दिल्ली : सध्या सुरू असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारताचे सगळे सामने दुबईत खेळवले जात आहेत. याचा भारताला फायदा होत असल्याची टीका अनेक संघांच्या खेळाडूंनी आणि क्रिकेट तज्ज्ञांनी केली होती. भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू आणि क्रिकेट समालोचक सुनील गावस्कर यांनी या सर्वांचा समाचार घेतला आहे. गावस्कर म्हणतात, जे खेळाडू भारताबाबत तक्रार करत आहेत, त्यांनी आपल्या देशाच्या विकासावर लक्ष केंद्रित करायला हवे. कारण, भारतीय क्रिकेटमुळेच त्यांना पगार मिळत असल्याचे त्यांनी सुनावले आहे. एकप्रकारे गावस्करांनी नासीर हुसैन, मायकल आथरटन आणि अन्य आजी – माजी क्रिकेटपटूंवर निशाणा साधला आहे. (sunil gavaskar roasts nasser hussain critics of dubai advantage to india in ct 2025 says their salaries come from india)

एका क्रीडा वृत्तवाहिनीच्या पॉडकास्टमध्ये आपली मते मांडताना नासीर हुसैन आणि मायकल आथरटन म्हणाले होते की, सध्याच्या परिस्थितीचा विचार करता, दुबईत सामने खेळत असल्याने भारताकडे होम पीच ऍडव्हांटेज आहे. सध्या चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळणारा दक्षिण अफ्रिकेचा फलंदाज रासी वॅन डेर डुसेन याने देखील अशाच पद्धतीचे विधान केले होते. या स्पर्धेतील इतर संघांप्रमाणे भारताला प्रवास करण्याची किंवा हॉटेल बदलण्याची आवश्यकता नाही. थोडक्यात, यामुळे रोहित शर्माच्या भारतीय संघाचा फायदा होत असल्याचे त्याला म्हणायचे होते. याबाबतच सुनील गावस्कर यांनी हे विधान केले असून याबाबत काही बोलणे योग्य नसल्याचेही म्हटले आहे.

हेही वाचा – High Court : पुरुषांना फसवण्याचा ट्रेंड, तक्रारदार महिला नेहमीच विश्वासार्ह नसतात, काय म्हणाले न्यायालय –

सुनील गावस्करांनी एका नियतकालिकाशी बोलताना यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. भारत दुबईत खेळतो, हा फायदा कसा काय असू शकतो, अशी विचारणा गावस्कर यांनी केली आहे. कारण, सामन्याचे पीच भारताच्या कंट्रोलमध्ये नाही. कोणत्याही दोन मॅच दरम्यान करावा लागणारा प्रवास ही नेहमीचीच गोष्ट आहे. त्यामुळे इतर खेळाडू ज्याप्रमाणे भारताला दोष देतात, तसे काही नाही. ते नेहमीच रडत असतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील भारताचे स्थान ते समजूच शकत नाहीत. गुणवत्ता, मानधन, कौशल्य आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या खेळातून पैसा मिळवून देण्यात भारतच आघाडीवर आहे.

जागतिक क्रिकेटमध्ये देखील भारताचे योगदान मोठे आहे. टेलीव्हिजन राइट्स तसेच मीडिया राइट्समध्ये देखील भारतच आघाडीवर असल्याची आठवण गावस्कर यांनी करून दिली. त्यामुळेच तुम्ही जी कमाई करता ती भारताच्याच जीवावर करत असल्याचेही गावस्कर यांनी सांगितले.

हेही वाचा – Ajit Pawar : तुम्ही लावालाव्या करायचं बंद करा अन् माझ्यासकट सगळ्यांनी…, काय म्हणाले अजित पवार

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या साखळी सामन्यात टीम इंडियाने बांगलादेश आणि पाकिस्तानला हरवत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. यातील एक सामना अजूनही बाकी आहे. तर इंग्लंडचा संघ दोन्ही मॅच हरली असून ती स्पर्धेच्या बाहेर गेली आहे. यानंतर गावस्करांनीही त्यांच्यावर निशाणा साधला आहे. तुम्ही सगळे बुद्धीमान आणि अनुभवी आहात. त्यामुळे भारताकडे लक्ष देण्यापेक्षा तुमचा संघ पात्र का ठरला नाही, याकडे का लक्ष देत नाही, अशी विचारणाही त्यांनी केली. सातत्याने भारतावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा तुम्ही कधीतरी स्वतःकडे लक्ष देणार आहात की नाही, असा सवाल त्यांनी केला आहे.