घरट्रेंडिंगआर्थिक अडचणीमुळे झाली पॉर्नस्टार; आता तिला परतायचंय मुळ क्षेत्रात

आर्थिक अडचणीमुळे झाली पॉर्नस्टार; आता तिला परतायचंय मुळ क्षेत्रात

Subscribe

आर्थिक परिस्थितीतून आलेल्या अडचणीमुळे सुपरकार रेसिंगच्या दुनियेतून पॉर्नस्टार झालेल्या रिनी ग्रेसीला आता पुन्हा आपल्या आधीच्या क्षेत्रात परतायचे आहे. तिला पुन्हा एकदा सुपरकारमध्ये बसून वाऱ्याशी स्पर्धा करायची आहे, याचा खुलासा तिने स्वतःच केला आहे. पॉर्न इंडस्ट्रीमध्ये मी आता बऱ्यापैकी पैसे कमवले असून मला आता पुन्हा रेसिंग क्षेत्रात जायचे असल्याचे रिनी सांगते.

रिनी ऑस्ट्रेलियातील V8 सुपरकार रेसिंगमधील पहिली पुर्णवेळ महिला रेसर होती. मात्र आर्थिक चणचणीमुळे तिने पॉर्न क्षेत्रात पाऊल ठेवले होते. तिच्या या निर्णयाला तिच्या कुटुंबाचाही पाठिंबा असल्याचे तिने सांगितले होते. या क्षेत्रात काम करत असताना तिने प्रति आठवडा २५ हजार अमेरिकी डॉलर्सची कमाई केली. एवढ्या पैशात तिने तिच्यावर असलेले ३० वर्षांचे कर्ज १२ महिन्यात फेडले, अशी माहिती टाइम्स नाऊ या संकेतस्थळाने दिली आहे.

View this post on Instagram

I really need to finish my tattoo 🤪

A post shared by RENÈE GRACIE 🧂 (@renee_gracie) on

- Advertisement -

 

- Advertisement -

आर्थिक अडचणीतून आता बाहेर आल्यानंतर रिनीला पुन्हा सुपरकार आकर्षित करु लागली आहे. स्पॉन्सर्स आणि आर्थिक गणिताचा फारसा विचार न करता मला पुन्हा रेसिंगमध्ये पदर्पण करायचे आहे. मात्र तिथे लोक मला पुन्हा स्विकारतील का? अशी शंकाही तिच्या मनात आहे. “त्या लोकांना मी पुन्हा यावी की नाही, हे मला माहीत नाही. पण आता मला कोणत्याही तणावात राहायचे नाही. कारण रेसिंग क्षेत्राच्या बाहेरही मला भविष्य आहे. रेसिंगचा मी आनंद घेत राहील. सध्या या क्षेत्राच्या बाहेर असूनदेखील मी सर्व माहिती ठेवते”, अशी प्रतिक्रिया न्युज कॉर्प या संकेतस्थळाशी बोलताना रिनीने दिली.

कोण आहे रिनी ग्रेसी

ऑस्ट्रेलियाची २५ वर्षीय रिनी ग्रेसी V8 सुपरकार ड्राइव्हर होती. २०१५ साली ती पहिली पुर्ण वेळ रेसर बनली होती. मात्र तिची कामगिरी खालावल्यामुळे २०१७ मध्ये तिला बाजूला सारण्यात आले. पुर्ण वेळ रेसरचे काम गेल्यानंतर तिच्याकडे कोणतेही स्पॉन्सर्स उरले नव्हते. तिला एका कार यार्डमध्ये नोकरी करावी लागली.

View this post on Instagram

Eyes on the prize #v8sc

A post shared by RENÈE GRACIE 🧂 (@renee_gracie) on

 

दरम्यानच्या काळात एका वेबसाईटवर तिला न्यूड फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी पैसे मिळतील अशी जाहीरात दिसली. सुरुवातीला तिने काही न्यूड फोटो अपलोड केल्यानंतर तिला एका आठवड्यात ३ हजार डॉलर्स मिळाले. डेली टेलिग्राफला दिलेल्या एका प्रतिक्रियेत रिनी म्हणते की, “मी पॉर्न इंडस्ट्रीमध्ये येऊन चांगला निर्णय घेतला. मला इथे आर्थिक स्थैर्य मिळाले आहे. इथे मी इतके पैसे कमवत आहे, ज्याचा विचारही मी आधी केला नव्हता.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -