घरदेश-विदेश'मुहूर्त' बघूनच चोरी करणारे दोघे भामटे अटकेत!

‘मुहूर्त’ बघूनच चोरी करणारे दोघे भामटे अटकेत!

Subscribe

या दोन भामट्या चोरांनी आतापर्यंत तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि कर्नाटकमध्ये चोऱ्या केल्या आहेत आणि त्याही फक्त मंगळवारी.

एखादं नवं काम सुरु करण्यासाठी आपण चांगला दिवस आणि शुभमुहूर्त जरूर पाहतो. कामात कोणत्याही प्रकारचं विघ्न येऊ नये यासाठी बहुतांशी लोक काम सुरु करण्यासाठी शुभमुहूर्ताची निवड करतात. मात्र, एखाद्या चोराने चोरी करण्यासाठी विशिष्ट दिवस किंवा चांगला मुहूर्त पाहल्याचं तुम्ही कधी ऐकलंयत का? तुम्हाला विश्वास बसणार नाही असा एक चोर वास्तवात आहे, जो केवळ मंगळवारीच चोरी करतो. अंधविश्वासाच्या आहारी गेलेला चोर चोरी करण्यासाठी मंगळवारचाच दिवस निवडतो. या अजब चोराने फक्त मंगळवारी चोरी करण्यामागचं कारण जेव्हा पोलिसांनी सांगितले, तेव्हा पोलीसही हैराण झाले. हैदराबाद पोलिसांनी काहीच दिवसांपूर्वी या अवलिया चोराला ताब्यात घेतले होते.

सूत्रांनुसार, मोहम्मद समीर खान असं या चोराचं नाव असून, मोहम्मद शोएब नावाचा त्याचा एक सहकारीसुद्धा आहे. चौकशीदरम्यान पोलिसांनी दोघांकडून तब्बल २१ लाख रुपयांचे सोने जप्त केले. हैदराबाद पोलीस आयुक्त अंजनी कुमार यांनी पत्रकारांना सांगितले, की ‘मुख्य आरोपी समीर खान याचे पूर्वज अफगणिस्तानमध्ये आहेत. मंगळवारी केलेली चोरी सफल होते अशी त्याची धारणा आहे. त्यामुळे तो आणि त्याचा सहकारी मंगळवारीच चोऱ्या करतात. अशाप्रकारे मुहूर्त पाहून चोरी करणारे चोर आमच्यासाठी नवीन आहेत. या दोघांनी आतापर्यंत तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि कर्नाटकमध्ये चोऱ्या केल्या आहेत.’

- Advertisement -

चोरी करण्याची खास तऱ्हा

आयुक्त अंजनी कुमार यांच्या माहितीनुसार, ‘समीर आणि त्याचा साथीदार शोएब हे दोघं मोटरसायकलवरुन चोरी करायला जायचे. ज्या घराला कुलूप असायचे अशाच घराची ते चोरी करण्यासाठी निवड करायचे. मग त्यांच्यांतला एक ते कुलूप तोडून आत जायचा तर दुसरा त्यावेळी बाहेर पहारा द्यायचा. हे दोघं कोणतीही चोरी फक्त ५ ते १० मिनिटात उरकून तिथून पसार व्हायचे.’


वाचा: ‘सीआयडी’ मालिकेसाठी चाहत्यांचं, #SaveCID कॅम्पेन
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -