लसींचा पुरवठा सध्या मर्यादित,असला तरी सर्वांचे लसीकरण योग्य प्रकारे होईल-आर एस शर्मा

Supply lag temporary, all will get vaccinated fairly says National Health Authority chief RS Sharma
लसींचा पुरवठा सध्या मर्यादित,असला तरी सर्वांचे लसीकरण योग्य प्रकारे होईल-आर एस शर्मालसींचा पुरवठा सध्या मर्यादित,असला तरी सर्वांचे लसीकरण योग्य प्रकारे होईल-आर एस शर्मा

देशात सध्या कोरोनाविरोधी लसीकरण मोहिम सुरु आहे. मात्र कोरोनाविरोधी लस घेण्यासाठी CoWin या अॅपवर रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे. यात एकाच वेळी देशातील विविध राज्यांमधील नागरिक अॅपवर रजिस्ट्रेशन करत असल्यास सर्व्हर डाऊन दाखवले जाते. त्यामुळे लसीकरणासाठी वेळ आणि तारीख निश्चित करत अपॉइंटमेंट शेड्यूल करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना लसीचा स्लॉट मिळ नाही. यावर बोलताना NHAप्रमुख आरएस शर्मा यांनी विस्तृत माहिती दिली आहे.

लसींच्या मागणी आणि पुरवठ्यामधील अंतर पाहून तुम्हीही चकित व्हाल

CoWin हे अॅप लसीकरणासाठी नागरिकांचा नोंदणी, लसीकरण स्लॉटचे वेळापत्रक तयार करणे यांसह इतरही सुविधांसाठी कार्य करते. या अॅपच्या माध्यमातून नोंदणी झालेल्या नागरिकांना वेळापत्रकाप्रमाणे लसींची उपलब्धता लक्षात घेऊन पुरवठा केला जातो. उदाहरणार्थ, जर दररोज १०० प्रवासी पहिलाच ट्रेनमध्ये असून १००० प्रवासी ट्रेन पकडण्यासाठी धावत असतील आणि जर १० लाख लोकं जर IRCTC वर तिकिट बुक करत असतील तर आपण समजू शकतो काय अडचणी कुठून सुरु झाल्या आहेत. आता १९ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण सुरु झाल्यामुळे लसीकरणात अडचणी येत आहेत. त्यामुळे लसींच्या मागणी आणि पुरवठ्यामधील अंतर पाहून तुम्हीही चकित व्हाल अशी परिस्थिती आहे. हे प्रमाण ६.५:१ आहे. परंतु एका आठवड्यापूर्वी हेच प्रमाण ११.१ टक्क्यावर पोहचले होते. लसींच्या मागणीनुसार पुरवठा सुरु झाल्यास CoWin वरील ताणही कमी होईल.अशी माहिती आर.एस.शर्मा यांनी दिली आहे.

CoWin वरील नोंदणीची तुलना फास्टर फिंगर, लॉटरीसोबत करणे चुकीचे

अनेक वेळा CoWin वर लसींचा स्लॉड हिरव्या रंगात दिसतो. परंतु Captcha मध्ये प्रवेश केल्यास स्लॉट बुक दाखवतात. परंतु ही परिस्थिती सुधारण्याची अपेक्षा आहे का? यावर बोलताना आरएस शर्मा सांगतात, CoWin वरील नोंदणीची तुलना फास्टर फिंगर स्पर्धा किंवा लॉटरीसोबत करणे चुकीचे आहे. कारण लस घेतल्यानंतर इथे कोणलाही विजेता म्हणून घोषित केले जात नाही. त्यामुळे लसींचा मर्यादित पुरवठा ही समस्या केवळ तात्पुरती आहे. लसींचा पुरवठा मागणीनुसार वाढत असल्याने येणाऱ्या काही दिवसांमध्ये सर्वांना नागरिकांना योग्य व समानतेने लस मिळणार आहे असे आश्वासनही त्यांनी दिले.

२१ मेपर्यंत २३ कोटी नागरिकांनी CoWin वर केली नोंदणी

स्लॉट बुक करणाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या रजिस्टर युजर्सचा सध्या काय बॅक लॉग आहे आणि यातील १८ ते ४४ वयोगटातील आहेत. या प्रश्नावर आर एस शर्मा सांगतात, २१ मेपर्यंत २३ कोटी नागरिकांनी CoWin वर लसीकरणासाठी नोंदणी केली. यातील १५ कोटी नागरिकांना लसीचा किमान एक डोस दिला आहे तर ४ कोटी नागरिकांना दोन्ही डोस दिले गेले. विशेष म्हणजे ९ कोटींमधील जवळपास ५.५ कोटी बॅकलॉग हे १८ ते ४४ वयोगटातील होते. हे प्रामुख्याने लसींच्या पुरवठ्यातील कमतरतेमुळे होत आहे. त्यामुळे विविध राज्य सरकारकडून विशिष्ट वयोगटातील नागरिकांचे प्रथम लसीकरण करावे यावर निर्णय घेतला जात आहे.

१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लसीचा स्लॉट ऑनलाईन बुकिंग अनिवार्य

१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लसीकरणासाठी स्लॉट ऑनलाईन बुकिंग अनिवार्य करण्यामागे हेतू नेमका का आहे याबद्दल सांगताना आस एस शर्मा सांगतात, CoWin अॅपच्या माध्यमातून देशात लसीकरण मोहिम राबलवी जात आहे. या अॅपच्या माध्यमातून केंद्र सरकारने लसीकरणासाठी ठरवून दिलेले धोरणांना अमलात आणले जाते. हे धोरण लस पुरवठ्याच्या उपलब्धतेवर आधारित असून ज्यात सतत बदल केले जातात. आम्ही कोरोना लसीकरण नियोजनाच्या विरोधात नाही, कारण १९ कोटीमधील ५७ टक्के लसीकरण हे वॉक इन होते.

ग्रामीण भागात मोबाईल फोन , इंटरनेट सुविधा नाहीत 

दरम्यान CoWin या डिजिटल अॅपवर भारताची लसीकरण मोहिम सुरु असली तरी त्यावरून अनेक टीका झाली, कारण ज्यांकडे मोबाईल, फोन, लॅपटॉपसारख्या डिजिटल वस्तूच नाहीत अशा नागरिकांसोबत भेदभाव होत आहे. विशेषत: ग्रामीण भागात स्मार्ट फोन किंवा इंटरनेट सुविधा नसलेल्या नागरिकांना याचा अधिक सामना करावा लागत आहे. यावर बोलताना आर एस शर्मा सांगतात, CoWin ही केंद्रीकृत डिजिटल प्रणाली सर्व नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करत आहे. नागरिकांना विश्वासार्ह स्त्रोत उपलब्ध करुन दिल्याने नागरिकांमध्ये आत्मविश्वास वाढवते. ही ऑनलाईन प्रक्रिया सर्वांसाठी उपलब्ध होण्यासाठी आम्ही नोंदणी प्रक्रिया सुलभ केली आहे. वेबसाईटवरील भाषेतील अडथळे दूर करण्यासाठी मोनोसाईलॅबिक / एकल शब्द प्रश्न वापर केला गेला आहे. यातून अजून मार्ग काढण्यासाठी आम्ही लवकरच १४ स्थानिक भाषांचा पर्याय निवडण्यासाठी व्यवस्था करत आहोत. साइन अप आणि नोंदणी केवळ मोबाइल नंबर, नाव, वय आणि लिंग विचारून केले जात आहे. CoWin अप्रूवलसाठी जास्तीत जास्त सात पर्याय उपलब्ध आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना लसीकरण नोंदणीसाठी मदत व्हावी म्हणून केंद्राने २५०,००० हून अधिक लसीकरण समुदाय सेवा केंद्रे (CSCS) सुसज्ज केली आहेत. याव्यतिरिक्त, नागरिकांना कॉलद्वारे साइन अप करण्याची सुविधा देण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणामध्ये कॉल सेंटर सुरू करण्यासाठी प्रयत्न करतोय. ग्रामीण भागात इंटरनेट नसल्यामुळे लसीकरण मोहिमेत अनेक बदल करतोय. सध्याच्या आकडेवारीनुसार, १५० कोटी नागरिकांनी आरोग्य सेतु अॅप डाऊनलोड केला आहे. दरमहा ३ अब्ज यूपीआय व्यवहार सुरु आहेत. ६० मिलियन लोकांनी डिजीलॉकरवर नोंद केली आहे. तर ४.२८ अब्ज डिजी -डॉक्यूमेंटस यात सेव आहेत.


Bank Holidays : जून महिन्यात तब्बल ९ दिवस बँका बंद, पाहा सुट्ट्यांची यादी