घरदेश-विदेशआधार, पॅनकार्ड जोडणी आवश्यक

आधार, पॅनकार्ड जोडणी आवश्यक

Subscribe

तुम्ही आधार कार्ड-पॅन कार्ड जोडणी केली आहे का? नाही.. मग तुम्हाला आयकर भरता येणार नाही. सुप्रीम कोर्टाने नुकत्याच दिलेल्या निकालानुसार, आयकर भरताना आधार आणि पॅन कार्ड जोडणी बंधनकारक केली आहे.

न्यायमूर्ती ए. के. सीक्री आणि न्यायमूर्ती ए. अब्दुल नजीर यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले आहेत. दिल्ली हायकोर्टाने आपल्या निर्णयामध्ये श्रेया सेन आणि जयश्री सातपुते यांना पॅन-आधार लिंक केलेले नसले तरीही 2018-19 साठी आयकर भरण्यास परवानगी दिली होती. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेले. त्यावरील सुनावणी दरम्यान, उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा तेव्हा सर्वोच्च न्यायालयात सुनावणी प्रक्रिया सुरु असल्याचे विचारात घेऊन दिला होता.

- Advertisement -

यानंतर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला होता. यामुळे आधार आणि पॅन कार्ड जोडणी आवश्यक असल्याचे म्हटले आहे. यामुळे 2019-20 साठी आयकर भरताना पॅन आधार जोडणी करावी लागणार आहे. अन्यथा भरलेला आयटीआर गृहीत धरला जाणार नाही, असे खंडपीठाने स्पष्ट केले. न्यायालयाने यापूर्वीच याबाबतचा निर्णय दिला असून आयकर कायदा 139 एए ला कायम ठेवले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -