घरदेश-विदेशजारकीहोळींच्या राजीनाम्यानंतर बेळगावात समर्थकाने घेतले स्वत:ला जाळून 

जारकीहोळींच्या राजीनाम्यानंतर बेळगावात समर्थकाने घेतले स्वत:ला जाळून 

Subscribe

कर्नाटकाच्या भाजपा सरकारमधील जलसंसाधन मंत्री व नेते बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी(ramesh jarkiholi) एका आक्षेपार्ह सीडी प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. या आक्षेपार्ह क्लीप समोर आल्यानंतर पक्षाची बदनामी टाळण्यासाठी जारकीहोळी यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्याकडे सोपावला. त्यांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेस नेते, सामाजिक कार्यकर्ते, आणि विविध संस्थांकडून भाजपावर दबाव टाकला जात होता. परंतु (karnataka minister ramesh jarkiholi resigned ) जारकीहोळी यांच्या राजीनाम्यानंतर बेळगावात समर्थकांकडून आज तीव्र आंदोलन सुरु आहे. बेळगावातील गोकाक भागात एका समर्थकाने आज स्वत:ला जाळून घेण्याचा प्रयत्न केला. या आगीत हा समर्थक गंभीर स्वरुपात भाजला आहे. याचबरोबर बेळगाव जिल्हाधिकारी कार्यलयावर जारकीहोळी समर्थकांकडूनही तीव्र आंदोलन सुरु आहे.

सध्या कर्नाटकमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि विधासभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु असतानात भाजपा नेते जारकीहोळी यांच्या अश्लील सीडी प्रकरणामुळे कर्नाकटचे राजकारण ठवळून गेले निघाले आहे. जारकीहोळींच्या या प्रकरणावर विविध सामाजिक कार्यकर्ते, विरोधी पक्षांकडून तीव्र शब्दात निषेध केला जात आहे. युवतीला कर्नाटक वीज प्रसारण मंडळात (केपीटीसीएल) नोकरी देण्याचे आमिष दाखवून मंत्री रमेश जारकीहोळी यांनी तिला जाळ्यात अडकविले व तिच्यावर दिल्लीतील कर्नाटक भवनमध्ये अत्याचार केले. सरकारी विश्रामधामाचा (आयबी) दुरुपयोग करत चित्रफीत जाहीर न करण्यासाठी तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप जारकीहोळी यांच्यावर ठेवत नागरी होराट समितीचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते दिनेश कल्लहोळ्ळी यांनी बंगळूर पोलिस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली. या कथित अश्लील सीडीवरून जारकीहोली यांच्याविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली जात असून अटक करण्याची मागणी केली जात आहे.

- Advertisement -

 

 

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -