भारतात शांतता संविधानामुळे नाही, हिंदुंमुळे; सर्वोच्च न्यायालयाचे वकिल अश्विनी उपाध्यायांचे मत

लोक अनेक गोष्टींच्या गप्पा मारतात पण मी म्हणतो की या देशात सुख-शांती, धर्मनिरपेक्षता ही केवळ संविधानामुळे नाही, भारतातील धर्मनिरपेक्षता आणि शांतता ही हिंदूंमुळेच प्रस्थापित झाली असल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे वकिल अश्विनी उपाध्याय यांनी म्हटले.

लोक अनेक गोष्टींच्या गप्पा मारतात पण मी म्हणतो की या देशात सुख-शांती, धर्मनिरपेक्षता ही केवळ संविधानामुळे नाही, भारतातील धर्मनिरपेक्षता आणि शांतता ही हिंदूंमुळेच प्रस्थापित झाली असल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे वकिल अश्विनी उपाध्याय यांनी म्हटले. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया म्हणजेच PFI आणि त्याच्याशी संबंधित इतर अनेक संघटनांवर केंद्र सरकारने बुधवार 28 सप्टेंबर रोजी बंदी घातली. याच पीएफआयच्या मुद्द्यावरून वकिल अश्विनी उपाध्याय यांनी आपले मत नोंदवले. (Supreme Court Advocate Ashwini Upadhyay In India Peace and brotherhood prevails not due to the Constitution but because of Hindus)

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया म्हणजेच PFI आणि त्याच्याशी संबंधित इतर अनेक संघटनांवर बंदी घातल्यानंतर. या मुद्द्यावर अनेक ठिकाणी चर्चासत्रे आयोजित करण्यात आली. यातील एका वृत्तवाहिनीच्या चर्चासत्रामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे वकिल अश्विनी उपाध्याय यांनी पीएफआयवर आपले मत मांडले.

“आजच पीएफआयवर बंदी घालण्यात आली. आजच काँग्रेसने दिग्विजय सिंह यांचे नाव काँग्रेस अध्यक्षपदासाठी सुचवले. यामागचे नेमके कारण काय? कदाचित उद्या ते काँग्रेसचे अध्यक्षही होतील. परंतु, दिग्विजय सिंह म्हणजे तेच, जे पीएफआयसोबत स्टेजवर कार्यक्रमांना उपस्थित राहत होते. या संघटनेचे सर्वात मोठे समर्थक आहेत. बाटला हाऊसला थ्रो-इन एन्काउंटर असल्याचे सांगतात. ओसामा आणि दाऊद सारख्या अतिरेक्यांनाही जी असे संबोधित करतात. या साऱ्याचे काय कारण असेल याचा विचार करायला हवा”, असे अश्विनी उपाध्याय यांनी म्हटले.

“पीएफआय संपल्याचे दिसते. मात्र, पीएफआयचा सर्वात मोठा समर्थक काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष होऊ शकतो. त्यामुळे यात नक्की काय संबंध ते तुम्ही ओळखू शकता? लोक अनेक गोष्टींच्या गप्पा मारतात पण मी म्हणतो की या देशात सुख-शांती, धर्मनिरपेक्षता ही केवळ संविधानामुळे नाही, भारतातील धर्मनिरपेक्षता आणि शांतता ही हिंदूंमुळेच प्रस्थापित झाली आहे. आधी हे हिंदू ९० टक्के होते, पण ते ७८ टक्क्यांवर आले आहेत”, असे सूचक विधान त्यांनी केले.

“ज्या ठिकाणी हिंदूंचा नाश झाला, तिथे धर्मनिरपेक्षता चालत नाही. काश्मीर, लडाख आणि लक्षद्वीपमध्ये धर्मनिरपेक्षता चालत नाही. शिवाय, या देशात बंधुभाव टिकून आहे, तो हिंदूंमुळेच आहे. पीएफआय दहशत पसरवते, लव्ह जिहादला समर्थन देते. धर्मांतर घडवून आणते. परदेशी निधी घेते. मदरसा चालवते. विविध पुस्तकांना समर्थन देते”, असे आरोपही त्यांनी केले.


हेही वाचा – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या सुरक्षेत वाढ; झेडवरून Z+ करण्याचा केंद्राचा निर्णय