Thursday, April 8, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश योग्य प्रक्रियेशिवाय रोहिंग्यांना म्यानमारला पाठवले जाणार नाही - SC चा निर्णय

योग्य प्रक्रियेशिवाय रोहिंग्यांना म्यानमारला पाठवले जाणार नाही – SC चा निर्णय

Related Story

- Advertisement -

जम्मूमध्ये अटकेत असलेल्या रोहिंग्या लोकांना परत म्यानमारला पाठविण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने गुरूवारी मोठा निर्णय दिला आहे. रोहिंग्यांची योग्य प्रक्रिया केल्याशिवाय त्यांना म्यानमारला पाठवले जाणार नाही. त्यामुळे अद्याप त्यांची सुटका केली जाणार नाही. तर प्रत्येकाला होल्डिंग सेंटरमध्येच राहावे लागणार आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. तर न्यायालयाने आपल्या आदेशात असेही म्हटले की, जम्मूमध्ये राहत असलेल्या रोहिंग्यांना ताब्यात घेतले आहे. या रोहिंग्यांना नियमांनुसार परत म्यानमारला पाठवले जाऊ शकते. पण एका जनहित याचिकेद्वारे मागणी करण्यात आली होती की, निर्वासित रोहिंग्यांना म्यानमार येथे पुन्हा पाठवण्यात येऊ नये कारण तेथे त्यांच्या जीवाला धोका असल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही रोहिंग्या लोकांच्या वतीने वकील प्रशांत भूषण यांनी एक याचिका दाखल केली होती. या याचिकेत असे म्हटले होते की, या लोकांना सोडण्यात यावे पंरतु त्यांना भारतात राहू द्यावे, अशी मागणी केली होती. मात्र केंद्र सरकारकडून याचा तीव्र विरोध करण्यात आला होता. तसेच होल्डिंग सेंटरमध्ये ठेवलेल्या या लोकांना भारतातून परत पाठवू नये, अशी मागणीही प्रशांत भूषण यांनी या याचिकेतून केली होती. तर भारतात राहणाऱ्या सर्व रोहिंग्याना शरणार्थींचा दर्जा देण्यात यायला हवा. यासोबतच ते असेही म्हणाले की, रोहिंग्या लोक भारताच्या सुरक्षेला धोका देत आहेत याचा कोणताही पुरावा समोर आलेला नाही.

- Advertisement -

या मागणीला विरोध करत सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले, ”ज्या आंतरराष्ट्रीय करारावर निर्णय घेण्यात आला, मात्र भारताने त्यावर स्वाक्षरी केलेली नाही. यासह भारत सरकारने सार्वभौमत्वाच्या आणि राष्ट्रीय हिताच्या आधारे अनेक आंतरराष्ट्रीय करारापासून स्वतःला दूर ठेवले आहे. तुषार मेहता यांनी पुढे असेही सांगितले की, भारत सरकारकडून म्यानमार सरकारशी चर्चा सुरू आहे. म्यानमार सरकारच्या निर्णयानंतरच या लोकांना परत पाठविण्यात येईल, असेही सांगितले जात आहे.

काय आहे प्रकरण

जम्मूमध्ये १५० हून अधिक रोहिंग्यांना ताब्यात घेऊन त्यांना होल्डिंग सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. पोलिसांच्या तपासणीत रोहिंग्या लोकं आपले कागदपत्र तपासण्यासाठी गेले होते. पोलिसांनी त्यांच्या कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर जम्मू-काश्मीरच्या पोलिसांनी काही जणांना घरी जाण्याची परवानगी दिली होती, मात्र मोठ्या प्रमाणावर जमलेल्या रोहिंग्यांना पुन्हा होल्डिंग सेंटरमध्ये जाण्यास सांगितले. यानुसार, हिरानगर येथे या सर्व रोहिंग्यांना ठेवण्यात आले आहे.


- Advertisement -


- Advertisement -