घरदेश-विदेशSC चा मोठा निर्णय, बलात्कार प्रकरणात कौमार्य चाचणीवर बंदी

SC चा मोठा निर्णय, बलात्कार प्रकरणात कौमार्य चाचणीवर बंदी

Subscribe

कौमार्य चाचणीसारख्या चाचण्या आजही घेतल्या जातात यावरून न्यायमूर्तींनी संताप व्यक्त केला आहे. कौमार्य चाचणीला कोणताही वैज्ञानिक आधार नसून अशा चाचण्या लैंगिक शोषणाला बळी पडणाऱ्यांसाठी अधिक त्रासदायक ठरतात, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

नवी दिल्ली – बलात्कार आणि लैंगिक शोषणातील प्रकरणांमध्ये कौमार्य चाचणी (Two Finger Test) घेण्यास सर्वोच्च न्यायालायने (Supreme Court) बंदी घातली आहे. आज झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालायने हा निर्णय घेतला आहे. न्यायमूर्ती डी.वाय चंद्रचूड आणि हिमा कोहली यांच्या खंडपीठाने हा निर्णय घेतला असून त्यांनी कौमार्य चाचणी करणाऱ्यांविरोधात ताशेरे ओढले आहेत. त्यामुळे यापुढे, बलात्कार किंवा लैंगिक शोषण सिद्ध करण्यासाठी पीडितेची कौमार्य चाचणी घेता येणार नाही. किंवा कौमार्य चाचणी एक प्रक्रिया म्हणून मान्य करता येणार नाही. (Supreme Court Banned Two Finger test in rape case)

हेही वाचा – ‘तुमची मुलगी बेशुद्ध पडलीय’ बलात्कार करणाऱ्या आरोपींचा वडिलांना फोन

- Advertisement -

कौमार्य चाचणीसारख्या चाचण्या आजही घेतल्या जातात यावरून न्यायमूर्तींनी संताप व्यक्त केला आहे. कौमार्य चाचणीला कोणताही वैज्ञानिक आधार नसून अशा चाचण्या लैंगिक शोषणाला बळी पडणाऱ्यांसाठी अधिक त्रासदायक ठरतात, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

हेही वाचा – बलात्काराचा गुन्हा मागे घेण्याकरता तृतीयपंथीयावर ब्लेडने हल्ला, फिनाईल पाजण्याचाही प्रयत्न

- Advertisement -

‘पीडितेचा लैंगिक संबंधाचा इतिहास अशा प्रकरणात पुरावा ठरत नाही. कौमार्य चाचण्या आजच्या काळातही होतात याचं आश्चर्य वाटतं. या चाचणीला कोणताही वैज्ञानिक आधार नाही,’ असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. ‘लैंगिकदृष्ट्या सक्रीय स्त्रियांवर बलात्कार केला जाऊ शकत नाही. पितृसत्ताक समाजात चुकीच्या पद्धतीने कौमार्य चाचणी घेतली जाते,’ असं सर्वोच्च न्यायालयाने नमूद केलं आहे.


लैंगिक शोषणातील पीडितांची कौमार्य चाचणी न घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. तसंच, याबाबत काळजी घेण्याचे आदेश आरोग्य मंत्रालयाला दिले आहेत. आरोग्य मंत्रालयाने याबाबत नियमावली जारी करून केंद्रासह राज्यातील सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालयांत ही नियमावली पाठवण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा – पत्नीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवणे बलात्कार आहे की नाही? सुप्रीम कोर्ट पुढच्या वर्षी देणार निर्णय

पीडित महिलांची चाचणी योग्य पद्धतीने करता यावी याकरता आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी विशेष शिबीर घेण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाने केल्या आहेत. तसंच, वैद्यकीय अभ्यासक्रमातही त्याबाबत नोंद करण्याचे सांगितले आहे.

हेही वाचा – कौमार्य चाचणी आता ठरणार लैंगिक अत्याचार; राज्य सरकारची घोषणा

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -