घरताज्या घडामोडीCBSE,ICSE बोर्ड बारावीच्या परीक्षा रद्दच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाचा शिक्कामोर्तब

CBSE,ICSE बोर्ड बारावीच्या परीक्षा रद्दच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाचा शिक्कामोर्तब

Subscribe

विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या जात असल्या म्हणून बोर्डाच्या परीक्षाही घेतल्या पाहिजेत अशी मागणी मान्य करता येणार नाही.

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं धुमाकूळ घातला असल्यामुळे देशातील कोरोनापरिस्थिती भयावह झाली होती. यामुळे केंद्र सरकारने उच्चस्तरीय बैठक घेऊन सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर आयसीएसई बोर्डाची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. याचिकाकर्त्याने याचिका दाखल करत जर आयआयटी जेईई आणि CLAT परीक्षा प्रत्यक्षात घेतल्या जाऊ शकतात तर १२वीच्या परीक्षा का घेतल्या जाऊ शकत नाहीत असा सवाल केला होता. अखेर सर्वोच्च न्यायालयाने सदर याचिका फेटाळून केंद्र रकारनं घेतलेला निर्णयच योग्य असल्याचे सांगितले आहे.

सर्वोच्च न्यायालयात CBSE,ISCE बोर्डाच्या १२वीच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली होती. तसेच विद्यार्थ्यांच्या मुल्यांकनाबाबतच्या निर्णयावरही आव्हान देण्यात आले होते. परंतु सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळत सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय योग्य असल्याचे म्हटलं आहे. तसेच परीक्षा रद्द केल्याच्या निर्णयात हस्तक्षेप करण्याची गरज नसल्याचेही न्यायालयानं म्हटलं आहे. केंद्र सरकार आणि सीबीएसई बोर्डाने विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने विचार करुन परीक्षा रद्द कऱण्याचा निर्णय घेतला असल्याचे न्यायालयाने नमूद केलं आहे.

- Advertisement -

तसेच इतर विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या जात असल्या म्हणून बोर्डाच्या परीक्षाही घेतल्या पाहिजेत अशी मागणी मान्य करता येणार नाही. देशातील जनता, विद्यार्थी आणि पालकांच्या भावनांचा विचार करुन निर्णय घेण्यात आला असल्याचे न्यायालयानं म्हटलं आहे.

- Advertisement -

असं होणार मूल्यांकन

बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांचे निकाल हे त्यांच्या मूल्यमापन करुन लावण्यात येणार आहेत. मूल्यमापनामध्ये ३ पद्धतीने गुण धरण्यात येणार आहेत. यामध्ये ३० टक्के मार्क हे विद्यार्थ्यांच्या दहावीच्या कामगिरीवर देण्यात येणार असून यामध्ये सर्वोत्कृष्ठ अशा ३ विषयांचा समावेश असेल. तर ३० टक्के गुण विद्यार्थ्यांनी ११वीत अंतिम परीक्षेत केलेल्या कामगिरीवर आधारित असतील आणि उर्वरित ४० टक्के गुण बारावीतील चाचणी परीक्षा, आणि सामायिक परीक्षेवर आधारीत असणार आहेत.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -