घर देश-विदेश दाभोलकर, गौरी लंकेश यांच्या हत्येबाबत सुप्रीम कोर्टाने सीबीआयला थेट विचारले; म्हणाले - काही...

दाभोलकर, गौरी लंकेश यांच्या हत्येबाबत सुप्रीम कोर्टाने सीबीआयला थेट विचारले; म्हणाले – काही…

Subscribe

नरेंद्र दाभोलकर यांची कन्या मुक्ता दाभोलकर यांच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठाने केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) हा प्रश्न विचारला.

नवी दिल्ली : डॉ. नरेंद्र दाभोलकर, सीपीआय नेते गोविंद पानसरे, कार्यकर्ते आणि पत्रकार गौरी लंकेश आणि अभ्यासक एमएम कलबुर्गी यांच्या हत्येमध्ये काही साम्य आहे का? असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी तपास यंत्रणा सीबीआयला केला.(Supreme Court directly asks CBI about killing of Dabholkar Gauri Lankesh Said Some)

नरेंद्र दाभोलकर यांची कन्या मुक्ता दाभोलकर यांच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठाने केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) हा प्रश्न विचारला. मुक्ता दाभोलकर यांनी आपल्या वडिलांच्या हत्येच्या तपासावर देखरेख ठेवण्यास नकार देत या वर्षीच्या 18 एप्रिलच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिले आहे. मुक्ता दाभोलकर यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील आनंद ग्रोव्हर यांनी खंडपीठाला सांगितले की, चार हत्येमागे मोठा कट होता. ते म्हणाले की, उपलब्ध पुराव्यांवरून असे सूचित होते की, या घटना एकमेकांशी जोडली जाऊ शकतात तोच मुद्दा मुक्ता दाभोलकर यांनी हा मुद्दा उच्च न्यायालयासमोर मांडला होता.

अशा झाल्या होत्या विचारवंताच्या हत्या

- Advertisement -

अंधश्रद्धेविरोधात आवाज उठवणाऱ्या दाभोलकर यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यात मॉर्निंग वॉक करताना दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. पानसरे यांची 20 फेब्रुवारी 2015 रोजी, तर गौरी लंकेश यांची 5 सप्टेंबर 2017 रोजी हत्या झाली होती. कलबुर्गी यांची 30 ऑगस्ट 2015 रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटना देशात खळबळ उडविणाऱ्या होत्या.

हेही वाचा : Manipur Violence : मणिपूर हिंसाचारतील दोन महिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव

हत्येमध्ये साम्य असल्याचा संशय

- Advertisement -

दाभोळकर, पानसरे आणि लंकेश यांच्या हत्येमध्ये साम्य असल्याचा सीबीआयला संशय असल्याचे ग्रोव्हर यांनी 18 मे रोजी सर्वोच्च न्यायालयात सांगितले होते. ते म्हणाले होते, या नंतरच्या घटनांमध्ये (पानसरे आणि लंकेश हत्या) आणि दाभोळकर यांच्या हत्यांमध्ये वापरलेली शस्त्रे एकच होती आणि गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्ती एकच असल्याचे तपासात आढळून आले आहे. त्यामुळे सीबीआयला अधिक तपास करायचा होता.

हेही वाचा : 3D Printed Post Office : प्रत्येक भारतीयाला वाटेल अभिमान; देशातील पहिले 3D प्रिंटेड पोस्ट ऑफिस ‘या’ शहरात

पुणे विशेष न्यायालयाने आरोप निश्चित केले होते

पुण्यातील विशेष न्यायालयाने 2021 मध्ये या गुन्ह्याचा कथित सूत्रधार वीरेंद्रसिंग तावडेविरुद्ध आरोप निश्चित केले होते. न्यायालयाने तावडे आणि इतर तिघांवर बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायद्यांतर्गत खून आणि गुन्हेगारी कट आणि दहशत संबंधित गुन्ह्यांचा आरोप ठेवला होता. दुसरा आरोपी संजीव पुनाळेकर याच्यावर पुरावे नष्ट केल्याचा आरोप आहे.

- Advertisment -