सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली राफेल प्रकरणी स्वतंत्र सुनावणीची याचिका

राफेल प्रकरणी स्वतंत्र सुनावणीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. फ्रांसीस एजेंसीच्या अहवालाच्या आधारावरून राफेलच्या व्यवहाराची चौकशीची मागणी करणारी जनहित याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

Supreme Court

राफेल प्रकरणी स्वतंत्र सुनावणीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. फ्रांसीस एजेंसीच्या अहवालाच्या आधारावरून राफेलच्या व्यवहाराची चौकशीची मागणी करणारी जनहित याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. राफेल खरेदीत झालेल्या भ्रष्टाचाराबाबत फ्रेंच पोर्टलच्या दाव्याबाबत ही दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाच्या देखरेखीखाली स्वतंत्र चौकशीचे आदेश देण्याची मागणी याचिकेत करण्यात आली होती. (supreme court dismisses public interest litigation seeking independent investigation in rafale case)

सरन्यायाधीश यूयू ललित आणि न्यायमूर्ती एस रवींद्र भट यांच्या खंडपीठाने अधिवक्ता एमएल शर्मा यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकांवर सुनावणी करण्यास नकार दिला. याचिकाकर्त्याने सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपासाठी कोणतेही कारण दिलेले नाही, हे सांगत सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावली. तसेच, सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर अधिवक्ता एमएल शर्मा यांनी आणखी एक विनंती करून याचिका मागे घेण्याची परवानगी मागितली. त्याचवेळी सर्वोच्च न्यायालयाने विनंती मान्य करताना आदेशात बदल करून याचिका फेटाळून लावली.

‘न्यायालय या याचिकेवर विचार करण्यास इच्छुक नाही’, असे सरन्यायाधीश यूयू ललित आणि न्यायमूर्ती एस रवींद्र भट यांनी वकील एमएल शर्मा यांना सांगितले. तसेच, खंडपीठाने सांगितले की, या न्यायालयाच्या हस्तक्षेपाची कोणतीही बाब समोर येत नाही. ‘न्यायालयाने याचिका फेटाळण्याचा आदेश आधीच दिला आहे’, असे सरन्यायाधीशांनी शर्मा यांना सांगितले. त्याचवेळी शर्मा यांनी या प्रकरणी सीबीआयकडे जाणार असल्याचे सांगितले. यावर सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, तुम्हाला कोणीही रोखत नाही.


हेही वाचा – रिलायन्सकडून भारतीयांना बंपर गिफ्ट, जिओ 5 जी इंटरनेट सेवा दिवाळीपासून सुरू होणार