Saturday, March 22, 2025
27 C
Mumbai
Homeदेश-विदेशRanveer Allahabadia : रणवीर अलाहाबादियाला युट्युबवरील शोला परवानगी पण सुप्रीम कोर्टाने ठेवली ही अट

Ranveer Allahabadia : रणवीर अलाहाबादियाला युट्युबवरील शोला परवानगी पण सुप्रीम कोर्टाने ठेवली ही अट

Subscribe

नवी दिल्ली : देशातील प्रसिद्ध युट्युबर रणवीर अलाहाबादिया समय रैनाच्या कार्यक्रमात गेला आणि त्याने आईवडिलांच्या नात्यावर एक वादग्रस्त विधान केले. त्यानंतर तो चांगलाच अडचणीत सापडला असून सर्वोच्च न्यायालयात त्याच्याविरोधात एक प्रकरण सुरू आहे. याच प्रकरणात त्याला मोठा दिलासा मिळाला असून न्यायालयाकडून अलाहाबादियाला त्याचा नेहमीचा पॉडकास्ट सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. पण न्यायालयाकडून त्याच्यासमोर काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. समय रैनाच्या कार्यक्रमात केलेल्या विधानाचा त्याच्यावर फार मोठा परिणाम झाला आहे. या सर्व प्रकरणात त्याचा नेहमीचा ‘दि रणवीर शो’लादेखील ब्रेक लावण्यात आला होता. (Supreme Court gave permission to upload yuotube shows of Ranveer Allahabadia)

हेही वाचा : Rohit Pawar : मी कुठेतरी कमी पडतोय असं काही नेत्यांना वाटत असावं; रोहित पवारांची शरद पवार गटातील नाराजी उघड 

रणवीर अलाहाबादियाने न्यायालयात धाव घेतली होती की, दि रणवीर शो हा त्याच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन आहे. म्हणूनच त्याला हा शो युट्युबवर पुन्हा एकदा सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी केली होती. यावरून सोमवारी (3 मार्च) सर्वोच्च न्यायालयाने रणवीर इलाहाबादियाला दिलासा दिला. पण त्याच्या कार्यक्रमात सभ्यता राखण्याचे कडक निर्देश दिले. न्यायालयाने ‘द रणवीर शो’चे प्रक्षेपण अटींसह पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. तत्पूर्वी, सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी रणवीर अलाहाबादियाच्या याचिकेला विरोध करत म्हटले की, इंडियाज गॉट लेटेंटमधील रणवीरच्या टिप्पण्या अश्लील आणि अयोग्य होत्या. कार्यक्रम प्रसारित करण्याच्या अलाहाबादियाच्या याचिकेवर सॉलिसिटर जनरल मेहता यांनी न्यायालयाला सांगितले की त्याला काही काळ गप्प राहण्याची परवानगी देण्यात यावी. पण, न्यायालयाने तसे केले नाही आणि अलाहाबादियाला दिलासा दिला.

सर्वोच्च न्यायालयाने रणवीर अलाहाबादियाला सध्या परदेशात जाण्याची परवानगी नाकारली आहे. न्यायालयाने रणवीर अलाहाबादियाला ‘द रणवीर शो’मध्ये या प्रकरणावर बोलण्यासही बंदी घातली होती. तसेच, सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सोशल मीडिया कंटेंटचे नियमन करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यास सांगितले. न्यायालयाने केंद्राला या प्रकरणात सर्व भागधारकांकडून सूचना देण्यास सांगितले. नैतिकता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांच्यामध्ये संतुलन राखण्याची गरज आहे, असेही न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने यापूर्वी अलाहाबादियाला सर्व प्रकारचे शो अपलोड करण्यास मनाई केली होती. द रणवीर शो पुन्हा सुरू करण्याची परवानगी देताना न्यायालयाने म्हटले आहे की, अलाहाबादियाला एक हमी द्यावी लागेल की हा शो नैतिकतेचे इच्छित मानके राखले जातील, जेणेकरून कोणत्याही वयोगटातील प्रेक्षक ते पाहू शकतील.