घरदेश-विदेशसुप्रीम कोर्टाला मिळाले आणखी 2 न्यायाधीश, राष्ट्रपतींकडून SC कॉलेजिमय शिफारशीला मान्यता

सुप्रीम कोर्टाला मिळाले आणखी 2 न्यायाधीश, राष्ट्रपतींकडून SC कॉलेजिमय शिफारशीला मान्यता

Subscribe

उच्च न्यायालयाच्या दोन मुख्य न्यायमूर्तींची सर्वोच्च न्यायालयात पदोन्नती करण्यात आली आहे. यामुळे सर्वोच्च न्यायालयातील एकूण न्यायाधीशांची संख्या 34 झाली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोर्ट कॉलेजियमच्या शिफारशीला मान्यता देत सर्वोच्च न्यायालयात दोन नवीन न्यायाधीशांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा केला आहे.

अलाहाबाद हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती राजेश बिंदल आणि गुजरात उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अरविंद कुमार अशी सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती करण्यात आलेल्या दोन न्यायाधीशांची नावे आहेत.

- Advertisement -

कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी ट्विट करत म्हटले की, भारतीय राज्यघटनेतील तरतुदींनुसार, भारताच्या माननीय राष्ट्रपतींनी उच्च न्यायालयांच्या खालील मुख्य न्यायाधीशांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश राजेश बिंदल आणि गुजरात उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अरविंद कुमार.

एकदा शपथ घेतल्यानंतर, सर्वोच्च न्यायालयात भारताच्या सरन्यायाधीशांसह 34 न्यायाधीशांची पूर्ण ताकद पुन्हा प्राप्त होईल. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने गेल्या महिन्यात त्यांच्या नावांची शिफारस केली होती. यापूर्वी गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात पाच न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली होती.


देशातील सर्वात महागडी घरं वरळीत; ‘या’ व्यावसायिकानं खरेदी केलं 240 कोटींचं घर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -