गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींना क्लिनचीट

गुजरातमध्ये असणाऱ्या अहमदाबाद शहरात 28 फेब्रुवारी 2002 मध्ये दंगल झाली होती. या दंगलीमध्ये एहसान जाफरीसह 69 जणांची हत्या करण्यात आली. मात्र त्यावेळी गुजरातच्या मुख्यमंत्री पदाची धुरा नरेंद्र मोदी यांच्या हाती होती. तपासानंतर एसटीआयने नरेंद्र मोदींसह 64 जणांना क्लिन चीट दिली होती. दरम्यान एसटीआयच्या या अहवालाविरोधात झाकिया यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

Supreme Court Gives Clean Chit To PM Narendra Modi In Gujarat Riots Case
गुजरात दंगलप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींना क्लीनचिट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. 2002 साली झालेल्या गुजरात दंगलं प्रकरणी कोर्टाने आता मोदींना क्लिन चीट दिली आहे. यापूर्वी देखील याच प्रकरणामध्ये एसआयटीनेही पंतप्रधान मोदींसह इतर लोकांना देखील क्लिन चीट दिली होती. गुजरात मध्ये घडलेल्या या दंगली विरोधात काँग्रेसचे माजी खासदार एहसान जाफरी यांच्या पत्नी झाकिया जाफरी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल कोली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने अखेर त्यांची याचिका फेटाळत पंतप्रधान नरेंद्र मोदींना क्लिन चीट दिली आहे.(Supreme Court Gives Clean Chit To PM Narendra Modi In Gujarat Riots Case)

झाकिया जाफरी यांच्या याचिकेत योग्यता नाही – सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए.एम खानविलकर यांच्या अघ्यक्षतेअंतर्गत खंडपीठासमोर ही सुनावणी सुरु होती. गेल्यावर्षी 9 डिसेंबर रोजी या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी पार पडल्यानंतर आज अखेर याप्रकरणी मोदींना क्लिनचीट कोर्टाने दिली आहे. दोन्ही पक्षांचं मत ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने हा निकाल राखून ठेवला होता. त्यानंतर आज एसटीआयच्या अहवालावर शिक्कामोर्तब करत झाकिया जाफरी यांनी दाखल केलेल्या याचिकेमध्ये योग्यता नाही असं म्हणत मोदींना क्लिनचीट दिलीये.

गुजरात दंगल प्रकरण काय ?

गुजरातमध्ये असणाऱ्या अहमदाबाद शहरात 28 फेब्रुवारी 2002 मध्ये दंगल झाली होती. या दंगलीमध्ये एहसान जाफरीसह 69 जणांची हत्या करण्यात आली. मात्र त्यावेळी गुजरातच्या मुख्यमंत्री पदाची धुरा नरेंद्र मोदी यांच्या हाती होती. तपासानंतर एसटीआयने नरेंद्र मोदींसह 64 जणांना क्लिन चीट दिली होती. दरम्यान एसटीआयच्या या अहवालाविरोधात झाकिया यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. ज्येष्ठ वकिल कपिल सिब्बल यांनी झाकिया यांची बाजू न्यायालयात मांडली. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी,सीटी रविकुमार यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडत होती. आात यासंपूर्ण प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्लिनचीट देत मोठा दिलासा दिलाय.


हे हि वाचा –  राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी द्रौपदी मुर्मू आज अर्ज दाखल करणार