फॅक्ट चेकर मोहम्मद जुबैरला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर

सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यावर असलेल्या सहाही गुन्ह्यांप्रकरणी अंतरिम जामीन मंजूर केला आहे.

mohammad zubair arrested for hurting religious sentiments now appears in delhi court soon

अल्ट न्युजचे को-फाऊंडर आणि फॅक्ट चेकर मोहम्मद जुबैर याला सर्वोच्च न्यायालायने तात्पुरता दिलासा आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यावर असलेल्या सहाही गुन्ह्यांप्रकरणी अंतरिम जामीन मंजूर केला आहे. (Supreme Court grants interim bail to fact-checking website Alt News co-founder Mohammad Zubair in all the six FIRs registered against him in Uttar Pradesh)

दिल्ली न्यायालायने मोहम्मद जुबैर याला जामीन मंजूर केल्यानंतर उत्तर प्रदेशातील ५ जिल्ह्यात सहा ठिकाणी त्याच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे गुन्हे रद्द करण्यासाठी मोहम्मद जुबैर याने सर्वोच्च न्यायलयात दाद मागितली होती. तसेच, याप्रकरणी लवकरात लवकर सुनावणी व्हावी अशी मागणी केली होती. त्यावर आज सुनावणी झाली असून मोहम्मद जुबैरला अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. मोहम्मद जुबैर याच्याविरोधात विविध सहा ठिकाणी असलेल्या गुन्ह्यांवर कारवाई करण्यावर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती आणली आहे.


काय आहे प्रकरण?

मोहम्मद जुबेरवर 2018 साली वादग्रस्त ट्विट करून हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल करून 27 जून रोजी झुबेरला अटक केली, यावेळी त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. यानंतर पुन्हा 28 जून रोजी त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर चार दिवसांची कोठडी सुनावली. यावेळी मोहम्मद जुबेरने रिमांड आदेशाच्या वैधतेला आव्हान दिले.