घर देश-विदेश मृत्यूदंडाची शिक्षा देणाऱ्या पाटणा उच्च न्यायालयाला सुप्रीम कोर्टाने सुनावले; म्हणाले- पुन्हा एकदा...

मृत्यूदंडाची शिक्षा देणाऱ्या पाटणा उच्च न्यायालयाला सुप्रीम कोर्टाने सुनावले; म्हणाले- पुन्हा एकदा…

Subscribe

2015 साली घरी टीव्ही पाहण्यासाठी आलेल्या एका 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा गळा दाबून खून केला होता.

नवी दिल्ली: एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपीस पाटणा उच्च न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेविरोधात आरोपीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल केली होती. या याचिकेवर झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने पाटणा उच्च न्यायालयाला फटकारत पुन्हा एकदा घटनापीठ गठीत करून प्रकरणाची सुनावणी करावी असे आदेश दिले आहे.(Supreme Court hears Patna High Court awarding death sentence; Said – once again…)

2015 साली घरी टीव्ही पाहण्यासाठी आलेल्या एका 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा गळा दाबून खून केला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीस अटक केली होती. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले होते. आधी भागलपूर न्यायालयाने या प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर हे प्रकरण पाटणा उच्च न्यायालयात गेले होते. पाटणा उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत न्यायालयाने आरोपीची फाशीची शिक्षा कायम ठेवण्यात आली होती.

- Advertisement -

हेही वाचा : INDIA आघाडीच्या मोठ्या बैठकांना आता पूर्णविराम; समन्वय समिती साधणार ‘समन्वय’

काय म्हणाले सर्वोच्च न्यायालय?

पाटणा उच्च न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, एका न्यायाधीशाने निष्पक्ष असले पाहिजे. मात्र,याचा अर्थ हा होत नाही त्याने कुठल्याही गोष्टीकडे डोळेझाक करावी आणि रोबोप्रमाणे काम करावे. सर्वोच्च न्यायालयाने पाटणा उच्च न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेवर ही टिप्पणी केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : आता पारंपरिक वेशात दिसणार नौदलाचे सैनिक; ‘असा’ आहे नवा ड्रेस कोड !

सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केले प्रश्न

आधी भागलपूर न्यायालयाने अल्पवयीन मुलीच्या बलात्कार आणि खुनाप्रकरणी आरोपीस फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर पाटणा उच्च न्यायालयाने ही शिक्षा कायम ठेवली होती. मात्र, जेंव्हा हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले असता सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, जर तपास अधिकाऱ्याच्या तपास अहवालात त्रुटी आहेत आणि एक गंभीर चूक या प्रकरणात आहे तर मग वैद्यकीय चाचणी का करण्यात आली नाही? तपास अधिकाऱ्याने त्यांच्याकडून ज्या त्रुटी झाल्या त्याविषयी स्पष्टीकरण का दिले नाही? हे प्रश्न विचारत पाटणा उच्च न्यायालयाकडे परत पाठवण्यात आले आहे.

नऊ वर्षापासून आरोपी कारागृहात

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपीस शिक्षा सुनावल्यापासून तो कारागृहात आहे. त्याला नऊ वर्षे उलटले असून, पाटणा उच्च न्यायालयाने या प्रकरणी न्यायाधीशांचे एक घटनापीठ तयार करावे आणि या प्रकरणात योग्य तो निर्णय घ्यावा असेही म्हटले आहे.

- Advertisment -