घरदेश-विदेशSupreme Court : अवमान प्रकरणी प्रशांत भूषण यांना एक रुपयाचा दंड

Supreme Court : अवमान प्रकरणी प्रशांत भूषण यांना एक रुपयाचा दंड

Subscribe

ज्येष्ठ वकिल प्रशांत भूषण यांना कोर्टाचा अवमान केल्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने एक रुपयाचा दंड ठोठावला आहे. कोर्टाने प्रशांत भूषण यांना १५ सप्टेंबरपर्यंत हा दंड भरण्यास सांगितला आहे. तसेच दंड न भरल्यास प्रशांत भूषण यांना तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची आणि तीन वर्षांकरता वकिली करण्यापासून रोखले जाईल, असेही सुप्रीम कोर्टाने यावेळी म्हटले आहे. प्रशांत भूषण यांना न्यायाधीश अरुण मिश्रा यांच्या खंडपीठाने ही शिक्षा सुनावली.

- Advertisement -

काय आहे प्रकरण

काही महिन्यांपूर्वी सरन्यायाधीश शरद बोबडे यांचा नागपूर राजभवन येथील मोटारसायलवरील फोटो प्रसिद्ध झाला होता. त्यावर ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी ट्विटच्या माध्यमातून टिप्पणी केली होती. त्या ट्विटची दखल घेत सुप्रीम कोर्टाने प्रशांत भूषण यांनी कोर्टाता अवमान केल्याची नोटीस बजावली होती. प्रशांत भूषण यांनी ६ वर्षांतील सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करणारे देखील ट्विट केले होते. मग वकील महेश महेश्वरी यांनी हा न्यायालयाचा अवमान असून भूषण यांच्याविरोधात कारवाईची मागणी केली होती. याच पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाने भूषण यांच्याकडे या दोन ट्विटबद्दल स्पष्टीकरण मागितले होते. तसेच भूषण यांनी न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारणे दाखवा अशी देखील नोटीस कोर्टाने बजावली होती. त्यानंतर प्रशांत भूषण यांनी नोटीशीचे उत्तर ते म्हणाले की, ‘ट्विट हे न्यायाधीशांच्या वैयक्तिक पातळीवर असून यात न्यायालयाचा अवमान करण्यात आला नव्हता. मात्र गेल्या सुनावणीत प्रशांत भूषण यांना दोषी ठरवण्यात आले असून आज सुप्रीम कोर्टाने त्यांना शिक्षा सुनावली आहे.

हेही वाचा –

भारत – चीन सैनिकांमध्ये पुन्हा संघर्ष; पूर्व लडाख भागात घुसखोरीचा प्रयत्न

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -