Friday, June 18, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर CORONA UPDATE सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिश कोरोनामुळे १८ दिवस कार्यालयातच राहिले आयसोलेट

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिश कोरोनामुळे १८ दिवस कार्यालयातच राहिले आयसोलेट

Related Story

- Advertisement -

देशात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने हैदोस घातला असून सामान्य व्यक्तींपासून देशातील सर्वोच्च पदावर असणाऱ्या व्यक्तींनाही कोरोनाची झळ सहन करावी लागत आहे. दुसऱ्या लाटेच्या प्रकोपात अनेकांना कोरोनाची लागण झाले असून मृतांचा आकडाही वाढला आहे. मंळगवारी एका सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती आणि ज्येष्ठ वकिलांची चर्चा झाली. यावेळी काहींनी आपण कोरोनाशी लढा कसा दिला याचा अनुभव सांगितला तर बहुतेक वकिलांनी कोरोना परिस्थिती सुधारण्यासाठी देवासमोर प्रार्थना करत प्रत्यक्षात कोर्टात सुनावणी होऊ दे अशी मागणी केली.

कार्यालयातील पुस्तकांनी दिला मोठा आधार 

यावेळी सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचुड यांनी कोरोनामुळे १८ दिवस कार्यालयातच राहिले आयसोलेट राहिल्याबद्दलचे अनुभव शेअर केले आहेत. यावर बोलताना न्यायमूर्ती चंद्रचुड म्हणाले की, मला कोरोनाचा संसर्ग झाला. परंतु घरातल्या कुणालाही माझ्यामुळे संसर्ग होऊ नये म्हणून मी कार्यालयातच राहिलो. परंतु मी कोरोनातून बरा होत नाही तोवर माझ्या पत्नीलाही कोरोनाची लागण झाली. परंतु जे व्हायचे नव्हते तेच झाले. परंतु मी १८ दिवस कार्यालयातच आयसोलेशनमध्ये राहिलो. या काळात मा कार्यालयातील पुस्तकांनी मोठा आधार दिला. असे ते सांगतात. सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती चंद्रचुड आणि न्यायमूर्ती एम.आर.शहा यांच्या खंडपीठासमोर पश्चिम बंगालच्या अवैध कोळसा खननसंबंधीत एका खटल्यावर ऑनलाईन सुनावणी सुरु होती. यावेळी न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचुड यांनी १८ दिवस कार्यालयातच राहिले आयसोलेशन अनुभवाची आठवण शेअर केली.

कार्यालयात एकटे राहणे अगदी कंटळवाणे 

- Advertisement -

याबरोबर सुप्रीम कोर्टातील ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनीही कोरोना संसर्गानंतर आपल्या कार्यालयात आयसोलेशनमध्ये राहिल्यानंतरचे अनुभव शेअर केला. यावर बोलताना वकील सिंघवी म्हणाले की, मलाही गेल्यावर्षी जून महिन्यातच कोरोनाची बाधा झाली होती. परंतु आता शरीरात अँटिबॉडीही तयार झाल्या असून मी कोरोनाविरोधी लसीचे दोन डोस पूर्ण केले आहेत. त्यामुळे मला ट्रिपल प्रोटेक्शन आहे. तर तिसरे ज्येष्ठ वकील दुष्यंत दवे म्हणाले की, कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून मी माझ्या ऑफिसातच एकटा राहत होतो. स्वत:च सगळी कामं करायचो. एखाद्या वकिलाला त्याच्याच ऑफिसमध्ये एकटं रहायला लागणं खूपच कंटाळवाणं असतं. ऑफिसात कुणीही येत नाही की बाहेर जात नाही. नेहमी गर्दी आणि माणसांची सवय असलेल्या वकिलाला हे थोडं अवघडच जातं.’


Coronavirus : युरोपियन देशांमध्ये डेल्टा, बीटा, गॅमापेक्षा ‘हा’ व्हेरियंट ठरतोय अधिक धोकादायक


 

- Advertisement -