Homeताज्या घडामोडीGurmeet Ram Rahim : राम रहीमला न्यायालयाची नोटीस; HCच्या निकालाला CBIचं SCमध्ये...

Gurmeet Ram Rahim : राम रहीमला न्यायालयाची नोटीस; HCच्या निकालाला CBIचं SCमध्ये आव्हान

Subscribe

बहुचर्चित रणजीत सिंग हत्या प्रकरणात उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर निर्दोष सुटलेला डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग याला सर्वोच्च न्यायालयाने नोटीस दिली आहे. मे 2024 मध्ये पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने राम रहीमची हत्या प्रकरणात निर्दोष मुक्तता केली होती.

मुंबई : बहुचर्चित रणजीत सिंग हत्या प्रकरणात उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर निर्दोष सुटलेला डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग याला सर्वोच्च न्यायालयाने नोटीस दिली आहे. मे 2024 मध्ये पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने राम रहीमची हत्या प्रकरणात निर्दोष मुक्तता केली होती. मात्र, या खून प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. आता सर्वोच्च न्यायालयाने डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग आणि इतर चार जणांना नोटीस बजावली आहे. (Supreme Court notice to Gurmeet Ram Rahim CBI challenged the acquitting them from High Court)

28 मे 2024 रोजी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने सीबीआयची शिक्षा नाकारली आणि राम रहीमसह चार आरोपींची निर्दोष मुक्तता केली. मात्र, सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर आता ससरन्यायाधीश संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती संजय कुमार यांच्या खंडपीठाने या खटल्यातून निर्दोष सुटलेल्या आरोपींकडून उत्तर मागितले आहे. त्यामुळे गुरमीत राम रहीम सिंग याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

2022 मध्ये झाली होती रणजित सिंग यांची हत्या

10 जुलै 2002 रोजी संध्याकाळच्या सुमारास सिरसा डेराचे व्यवस्थापक रणजित सिंग यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. 2003 मध्ये या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. तपासानंतर सीबीआयने डेरा प्रमुख गुरमीत राम रहीमला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र, सीबीआयची शिक्षा फेटाळून उच्च न्यायालयाने राम रहीमची निर्दोष मुक्तता केली होती. ज्या बंदुकीतून गोळीबार केल्याचे सांगितले जात होते ती बंदूक घटनेच्या वेळी शस्त्रागारात ठेवली होती, असे उच्च न्यायालयाने म्हटले होते.

दरम्यान, गुन्ह्यात वापरलेली कारही जप्त करण्यात आलेली नाही. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, चार जण वाहनातून गोळीबार करत होते, त्यामुळे उर्वरित तीन शस्त्रे कुठे आहेत, असा सवाल उपस्थित करत तपास अपूर्ण असून सादर केलेले पुरावे विश्वासार्ह नसल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने पाच आरोपींची याचिका मान्य करून त्यांची निर्दोष मुक्तता केली.

- Advertisement -

2003 मध्ये तपास सीबीआयकडे वर्ग

पोलिसांच्या तपासावर असमाधानी असलेल्या रणजित सिंग यांचा मुलगा जगसीर सिंग याने जानेवारी 2003 मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल करून याप्रकरणी सीबीआय तपासाची मागणी केली होती. उच्च न्यायालयाने मुलाच्या बाजूने निकाल देत या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला होता. या प्रकरणाचा तपास करत असताना सीबीआयने राम रहीमसह पाच जणांवर गुन्हा दाखल केला होता. 2007 मध्ये न्यायालयाने आरोपींवर आरोप निश्चित केले होते.

या प्रकरणात सुरुवातीला डेरामुखीचं नाव नसलं तरी 2003 मध्ये सीबीआयकडे तपास सोपवण्यात आल्यानंतर 2006 मध्ये राम रहीमचा ड्रायव्हर खट्टा सिंग याच्या वक्तव्याच्या आधारे या हत्या प्रकरणात डेराप्रमुखाचं नाव समोर आलं होतं.


हेही वाचा – Kareena Kapoor : कुमार विश्वासांच्या टीकेवरून यूपीत रंगले राजकारण, सपा आणि भाजपा आमनेसामने

Vaibhav Patil
Vaibhav Patil
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -