Homeक्राइमSupreme Court : सदोष तपासाच्या आधारावर...; आरएसएस स्वयंसेवकांच्या हत्येप्रकरणी न्यायालयाने काय म्हटले?

Supreme Court : सदोष तपासाच्या आधारावर…; आरएसएस स्वयंसेवकांच्या हत्येप्रकरणी न्यायालयाने काय म्हटले?

Subscribe

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि विश्व हिंदू परिषदेच्या दोन स्वयंसेवकांची केरळमध्ये झालेल्या हत्येप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी केवळ सदोष तपासाच्या आधारे आरोपी निर्दोष सुटू शकत नाही, अशी टिप्पणी न्यायालयाने केली.

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि विश्व हिंदू परिषदेच्या दोन स्वयंसेवकांची केरळमध्ये झालेल्या हत्येप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी केवळ सदोष तपासाच्या आधारे आरोपी निर्दोष सुटू शकत नाही, अशी टिप्पणी न्यायालयाने केली. तसेच केरळ उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरूद्ध आरोपींचे अपील फेटाळले आहे. (Supreme Court refuses to acquit accused in RSS workers murder case)

एप्रिल 2002 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि विश्व हिंदू परिषदेच्या दोन स्वयंसेवाची हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी केरळ उच्च न्यायालयाने 12 एप्रिल 2011 रोजी पाच सीपीआय (एम) लोकांना दोषी ठरवले होते. यातील एका दोषीचा नंतर मृत्यू झाला. दोन स्वयंसेवकांच्या हत्येप्रकरणी निर्दोष सुटका व्हावी यासाठी आरोपींनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर निकाल देताना न्यायमूर्ती सुधांशू धुलिया आणि प्रसन्ना बी वराळे यांच्या खंडपीठाने म्हटले की, केरळ उच्च न्यायालयाने दिलेल्या फौजदारी अपीलच्या निकालात आम्हाला कोणताही दोष दिसत नाही. त्यामुळे आरोपींनी दाखल केलेले अपील फेटाळण्यास पात्र आहे, या निष्कर्षापर्यंत आम्ही पोहोचलो आहोत.

- Advertisement -

हेही वाचा – Maintenance to Mother-in-law : न्यायासाठी अपवाद करत पंजाब-हरियाणा हायकोर्टाचा निर्णय, काय आहे प्रकरण?

न्यायालयाने केरळ पोलिसांच्या तपासावर ओढले ताशेरे

केरळ पोलिसांनी या प्रकरणाचा योग्य तपास न केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालायने ताशेरे ओढले आहेत. रेकॉर्डवरील संपूर्ण पुराव्याचे वाचन केल्यास तपास योग्य आणि शिस्तबद्ध पद्धतीने झाला नसल्याचे दिसून येत आहे. अशा अनेत बाजू आहेत, जिथे योग्य तपासामुळे ही केस मजबूत झाली असती. त्यामुळे केवळ दोषपूर्ण तपासामुळे आरोपींना फायदा मिळू शकत नाही. तसेच प्रत्यक्षदर्शींचे जबाब, वैद्यकीय अहवाल इत्यादींचा विचार करणे न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रात आहे. त्यामुळे आरोपी निर्दोष सुटण्याचा दावा करू शकत नाही, अशी या न्यायालयाची सातत्याने भूमिका राहिली असल्याचेही म्हटले आहे.

- Advertisement -

न्यायालयाने साक्षीदारांचे केले कौतुक

दरम्यान, आरोपीच्या वकिलांनी फिर्यादी साक्षीदारांच्या, विशेषत: प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या साक्षीमध्ये विरोधाभास असल्याचा आरोप केला. यावर न्यायालयाने सांगितले की, साक्षीदारांच्या जबाबात तफावत असली तरी ती किरकोळ आहे. परंतु फिर्यादी साक्षीदार 1, 2 आणि 4 यांचे जबाब प्रामाणिक आणि विश्वासार्ह होते, अशे म्हणत न्यायालयाने साक्षीदारांचे कौतुक केले.

हेही वाचा – Dadar Railway Station : दादर रेल्वे स्थानक महिलांसाठी असुरक्षित? भरदिवसा माथेफिरूने कापले तरुणीचे केस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -