..तर हजारो डॉक्टरांचं नुकसान होईल, NEET PG परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी SCने फेटाळली

Supreme Court rejected demand to postpone NEET PG exam
..तर हजारो डॉक्टरांचं नुकसान होईल, NEET PG परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी SCने फेटाळली

नीट पीजी NEET PG परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे. परीक्षा स्थगित केल्यास हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान होईल असे मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांच्याकडे आयएमएने पत्राद्वारे परीक्षा स्थगित करण्याची मागणी केली आहे. नीट पीजी परीक्षा 21 मो रोजी हणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने नीट पीजी परीक्षा पुढे ढकलण्याची याचिका फेटाळली आहे. नीट पीजी परीक्षेला स्थगिती दिल्यास गेल्या अनेक दिवसांपासून तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांना भारतीय वैद्यकीय संघटनेकडून पत्र लिहिण्यात आले आहे. परीक्षेची तारीख पुढे ढकलण्याबाबत विचार करण्यात यावा अशी मागणी आयएमएने केली आहे. 21 मे रोजी होणारी NEET PG 2022 परीक्षा पुढे ढकलण्याचे आवाहन केले आहे. 2021 मधील समुपदेशन आणि त्यानंतरची परीक्षा यांच्यातील फारच कमी अंतरामुळे 5000 हून अधिक वैद्यकीय इंटर्न अपात्र ठरले आहेत, असे IMA ने आपल्या पत्रात म्हटलं आहे.

21 मे रोजी होणारी NEET-PG 2022 पुढे ढकलण्याची याचिका फेटाळताना म्हणाले की, यावेळी परीक्षा पुढे ढकलल्याने केवळ गोंधळ आणि अनिश्चितता निर्माण होईल. यामुळे रुग्णसेवेवरही परिणाम होणार असून, तयारी करणाऱ्या 2 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची गैरसोय होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्यामुळे आता नीट पीजी परीक्षेचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येऊ शकते. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने या याचिकेवर निकाल देताना निरीक्षण केले आहे.


हेही वाचा : पुणे रेल्वे स्थानकावर आढळली बॉम्बसदृश्य वस्तू