नव्या संसदेतील अशोकचिन्हाला विरोध करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; म्हणाले…

supreme court rejects plea againts lions on state emblem at central vista

सेंट्रल व्हिस्टा म्हणजेच नवीन संसद भवनात अशोक चिन्हावरील सिंहांबाबत सर्वोच्च न्यायालयाने एक मोठी निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने संसदेतील अशोक चिन्हावरील सिंहांची मूर्ती हिंस्र असल्याचे सांगत विरोध करणारी तसेच चिन्हातील सिंहांच्या रुपात दुरुस्तीची मागणी करणारी याचिका फेटाळली आहे. तसेच या अशोक चिन्हात काहीच चुकीचे नसल्याचे कोर्टाने स्पष्ट केले आहे. याशिवाय सर्वोच्च न्यायालय कोणत्याही प्रकारे राष्ट्रीय चिन्ह कायद्याच्या विरोधात नसल्याचे म्हटले आहे. यामुळे सेंट्रल व्हिस्टामधील अशोकचिन्हावरील सिंह आहेत, त्याच स्थितीत दिसणार आहे.

संसदेच्या नवीन इमारतीत हिंस्र स्वरुपातील सिंहांच्या राष्ट्रीय चिन्हाविरोधातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, सेंट्रल व्हिस्टामध्ये कोणत्याही कायद्याचे उल्लंघन होत नाही. न्यायमूर्ती एम आर शहा यांच्या एकलपीठाने याचिकाकर्त्याला अशोकचिन्ह कसे असावे हे तुम्ही ठरवणार का? असा सवाल करत तुम्ही त्याकडे जसे पाहाल तसे तुम्हाला ते दिसेल. हे पाहणाऱ्याच्या विवेक बुद्धीवर अवलंबून असते. असं न्यायालय स्पष्टच सांगितले.

याचिकाकर्त्याने न्यायालयात दावा केला की, संसदेतील सिंहांची रचना भारतीय राज्य चिन्ह (अयोग्य वापराविरूद्ध प्रतिबंध) कायदा 2005चे उल्लंघन करणारी आहे. तसेच हे सिंह हिंस्र दिसत असून त्यांच्या रचनेत दुरुस्ती करण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली. तसेच या अशोक चिन्ह्यामुळे राष्ट्रीय भावना दुखावल्याचा दावाही त्यांनी केला.

या मुद्द्यावरून अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत अनेकांनी प्रतिक्रिया दिली. याशिवाय विरोधी पक्षांच्या सदस्यांनीही सरकारवर अशोक चिन्हाचे स्वरूप बदलल्याचा आरोप करते नवे चिन्ह बदलण्याची मागणी केली. यावर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सारनाथ येथील अशोक स्तंभावरील सिंहांचे स्वरूप आणि स्वभाव पूर्णपणे बदलणे हा भारताच्या राष्ट्रीय चिन्हाचा अपमान आहे, असा आरोप केला.

ज्यावर नगरविकासमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी उत्तर दिले, पुरी म्हणाले की, सारनाथ येथील राष्ट्रीय चिन्हाचा आकार वाढवला किंवा नवीन संसद भवनावरील चिन्हाचा आकार कमी केला तरी त्यात कोणताही फरक दिसत नाही, सारनाथ येथील मूळ प्रतीक 1.6 मीटर उंच आहे तर नवीन संसद भवनाच्या वरचे प्रतीक मोठे असून ते 6.5 मीटर उंच आहे.

अशोक स्तंभावरील या चिन्हाची प्रतिकृती जयपूर स्टुडिओ शिल्पकार लक्ष्मण व्यास यांच्या मार्गदर्शनाखाली 40 कारागिरांनी पाच महिने अहोरात्र मेहनत करून तयार केली आहे. मूळचे राजस्थानमधील हनुमानगड जिल्ह्यातील नोहर शहराचे रहिवासी लक्ष्मण व्यास यांना पंतप्रधान मोदींनी हा पुतळा बनवण्याच्या पद्धतीबद्दल विचारले आणि या कामासाठी त्यांचे अभिनंदन केले. विशेष म्हणजे 150 भाग जोडून बनवलेला हा पुतळा कधीही गंजणार नाही.


RSS प्रमुखांना ‘राष्ट्रपित्या’ची उपमा; इमाम प्रमुखांना शिरच्छेदाची धमकी