Lakhimpur Kheri Violence: लखीमपूर प्रकरणात सर्वोच्च न्यायालय स्वतः घालणार लक्ष, उद्या होणार सुनावणी

Supreme Court takes suo motu cognisance of Lakhimpur Kheri violence
Lakhimpur Kheri Violence: लखीमपूर प्रकरणात सर्वोच्च न्यायालय स्वतः घालणार लक्ष, उद्या होणार सुनावणी

उत्तर प्रदेशाच्या लखीमपूर खेरीमध्ये चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला आहे. लखीमपूरच्या या हिंसाचार पडसाद संपूर्ण देशभरात दिसून येत आहे. आता याप्रकरणात सर्वोच्च न्यायालय लक्ष देणार आहे. उद्या, गुरुवारी सरन्यायाधीश एन.व्ही.रमण यांच्या अध्यतेखाली तीन न्यायाधीशांच्या खंडपीठ याप्रकरणाची सुनावणी करणार आहे. याप्रकरणाचे शीर्षक लखीमपूर खेरी लीडिंग टू लॉस ऑफ लाईफ म्हणून ठेवले गेले आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि हिमा कोहली हे देखील खंडपीठाचे सदस्य असणार आहेत.

रविवारी लखमीपूर खेरी जिल्ह्यातील तिकोनिया क्षेत्रात झालेल्या हिंसेमध्ये चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्रा यांचे सुपुत्र आशिषसह अनेक जणांवर गुन्हा दाखल केला गेला आहे. पण अजूनही कोणालाही अटक करण्यात आली नाही आहे. दरम्यान अजय मिश्रा यांच्या मूळगावात कुस्तीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य उपस्थित राहणार होते.

पण यादरम्यान मंत्र्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलनाचे आयोजन केले. शेतकरी संघटनेचा आरोप आहे की, जेव्हा शेतकरी तिकोनिया क्षेत्रात आंदोलन करत होते तेव्हा अजय मिश्रा यांचा मुलाच्या गाडीने शेतकऱ्यांवरून गाडी नेली. यानंतर हिंसा अजून भडकली. या संपूर्ण प्रकरणात चार शेतकऱ्यांसह आठ जणांना मृत्यू झाला आहे.


हेही वाचा – Maharashtra Bandh: लखीमपूर हिंसाचार विरोधात ११ ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक